Deepak Kesarkar : स्वार्थ सिद्ध झाल्यास पालकमंत्रिपदाचा राजीनामा देईन; केसरकरांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

'ही इमारत ताब्यात घेण्यामागे माझा वैयक्तिक स्वार्थ नाही.'
Deepak Kesarkar
Deepak Kesarkaresakal
Updated on
Summary

श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा देण्यामध्ये कोणी राजकारण आणू नये.

कोल्हापूर : ‘शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. त्यांची गैरसोय होऊ नये. त्यांना सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी दर्शन मंडपासाठी इमारत उपलब्ध करून देण्याबाबत शेतकरी संघाला (Shetkari Sangh) फेब्रुवारीमध्ये प्रस्ताव दिला. त्याकडे संघाने दुर्लक्ष केले. त्यामुळे इमारत ताब्यात घेण्याची वेळ आली, असे स्पष्ट मत मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी व्यक्त केले.

ही इमारत ताब्यात घेण्यामागे माझा वैयक्तिक स्वार्थ नाही. तसे सिद्ध झाल्यास पालकमंत्रिपदाचा राजीनामा देईन,’ असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, शेतकरी संघाने दिलेल्या संयुक्त सुविधा निर्माण करण्याच्या प्रस्तावावर आता जिल्हाधिकारी निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.

Deepak Kesarkar
जयंत पाटलांच्या सुपुत्राकडून लोकसभेची तयारी? 100 गावांत गणपती आरतीसाठी हजेरी, माने-शेट्टींसह प्रतीक यांच्यात निवडणुकीची चिन्हे!

केसरकर म्हणाले, ‘कोल्हापूरचा (Ambabai Temple) ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासह पर्यटनदृष्ट्या कोल्हापूरचा विकास करण्याचा सरकारच्या माध्यमातून मी प्रयत्न करत आहे. शेतकरी संघाची इमारत ताब्यात घेण्यावरून माझ्यावर होणारे सर्व आरोप खोटे आणि राजकीय हेतूने होत आहेत. संघाची जागा हडप करण्याचा आरोप सिद्ध झाला तर पालकमंत्रिपदाचा राजीनामा देईन. खोटे आरोप मी सहन करणार नाही.

श्री. अंबाबाईची आणि छत्रपतींच्या गादीची सेवा करण्यात मला रस आहे. त्यामुळे श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा देण्यामध्ये कोणी राजकारण आणू नये. नवरात्रोत्सव थाटामाटात साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते.

Deepak Kesarkar
PM मोदींनी देशाची अर्थव्यवस्थाच अदानी, अंबानींना विकायचं ठरवलंय; 'वंचित'च्या सुजात आंबेडकरांचा घणाघात

एकाही शाळेचे खासगीकरण होणार नाही

‘खासगी कंपन्यांच्या सीएसआर निधीतून शाळांच्या इमारतीची देखभाल दुरूस्ती आणि आवश्यक सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. शाळांच्या व्यवस्थापनामध्ये कोणताही बदल होणार नाही. राज्यातील एकाही शाळेचे खासगीकरण केले जाणार नसल्याचे केसरकर यांनी सांगितले.

Deepak Kesarkar
Ganpati Visarjan Miravnuk : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत तुफान राडा; दोन मंडळांत जोरदार हाणामारीसह दगडफेक, तिघे जखमी

‘पीएमश्री’मध्ये ‘मेन राजाराम’चा समावेश, खासबागसाठी निधी

‘राज्यातील विविध शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित केल्या जात आहेत. त्या धर्तीवर या वर्षीच्या ‘पीएमश्री’ स्कूलच्या यादीमध्ये कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूलचा समावेश केला जाईल. त्याद्वारे या हायस्कूलचा विकास करण्यात येईल. खासबाग मैदानाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी भरीव निधी मंजूर केला आहे. पावसाळा संपल्यानंतर रस्त्यांची कामे सुरू होतील. त्याने शहरातील सर्व रस्ते चकचकीत होतील’, असे केसरकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()