Wedding Ceremony : लग्न सोहळ्यात नवरा-नवरीला उचलाल, तर भरावा लागणार 25 हजारांचा दंड, नेमका काय आहे प्रकार?

अलीकडच्या काळात लग्नकार्य हा एक ‘इव्हेंट’ बनत आहे.
Bagilage Villagers Marriage Ceremony
Bagilage Villagers Marriage Ceremonyesakal
Updated on
Summary

अत्यंत कमी खर्चात दिमाखदार सोहळा पार पडतो. पंधरा वर्षांपासून गावाने हा पायंडा पाडला आहे. अनेक गरीब, श्रीमंतांनी इथे लग्नविधी उरकले आहेत.

चंदगड : विवाहाच्यावेळी (Wedding Ceremony) नवरा-नवरी एकमेकांना पुष्पहार घालत असताना त्यांना उचलण्याचा खोडसाळपणा केला, तर तब्बल पंचवीस हजार रुपयांचा दंड आहे. डॉल्बीला (Dolby) गावातच बंदी आहे. लग्नविधी स्थानिक नागरिक पार पाडतात. आचारीसुध्दा स्थानिकच. मंदिरासमोर होणारे लग्न हे आपलेच आहे, अशा भावनेतून प्रत्येकजण जबाबदारी पार पाडतो. नवरा-नवरींसाठी मंदिराचा सभामंडप, तर वऱ्हाडी आणि इतर वऱ्हाडींसाठी आवारातील झाडांची गर्द सावलीच मंडपाचा आधार देते. उधळपट्टीला लगाम घालून अत्यंत कमी खर्चात कार्य पार पाडण्याचा आणि लग्नासारख्या शुभ कार्याचे पावित्र्य राखण्याचा प्रशंसनीय प्रयत्न बागीलगे (ता. चंदगड) ग्रामस्थांनी केला आहे.

Bagilage Villagers Marriage Ceremony
Wedding Invitation : नातेवाईकांच्या घरी जाऊन पत्रिका देण्याचे संपले दिवस, विवाहाचे निमंत्रण आता सोशल मीडियावरून.!

अलीकडच्या काळात लग्नकार्य हा एक ‘इव्हेंट’ बनत आहे. मध्यवर्ती ठिकाणी हॉल, भव्य मंडप, प्रवेशद्वारावर कारंजा, स्वागतासाठी खास वेषामध्ये नटलेले तरुण-तरुणी. नवऱ्यासाठी घोडा, नवरीसाठी पालखी, प्री-वेडिंग शूटचे मोठ्या पडद्यावर प्रक्षेपण, जेवणानंतर आईस्क्रीमची सोय. यात मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी होते. शेजाऱ्याने थाटात लग्न केले म्हणून आपणही तसेच करायला हवे, या ईर्षेतून कर्जे काढून लग्नकार्य करण्याचे प्रकारही कमी नाहीत. बागीलगे ग्रामस्थांनी (Bagilage Village) ज्यांना कमी खर्चात लग्नकार्य उरकायचे आहे, त्यांच्यासाठी पर्याय देण्याचा निर्णय घेतला.

Bagilage Villagers Marriage Ceremony
'धैर्यशील मानेंचा पराभव दिसू लागल्यानेच नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली'; 'स्वाभिमानी'च्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण

रवळनाथ मंदिरासमोर सुमारे अर्धा एकर जागा आहे. पिंपळ, वड, रेनट्री यासारख्या झाडांमुळे भर उन्हाळ्यातही इथे थंडगार सावली असते. त्यामुळे मंडप घालण्याची गरज नाही. पांडुरंग पाटील व मारुती पाटील हे लग्नविधीचे कार्य पार पाडतात. पिण्याच्या पाण्याची सोय ग्रामपंचायत करते. जेवण बनवणारे स्थानिक आचारीही सेवाभावी वृत्तीने काम करतात. प्रशस्त आवारात दीड-दोन हजार लोकांच्या पंगती सहजपणे उठतात.

अत्यंत कमी खर्चात दिमाखदार सोहळा पार पडतो. पंधरा वर्षांपासून गावाने हा पायंडा पाडला आहे. अनेक गरीब, श्रीमंतांनी इथे लग्नविधी उरकले आहेत. परगावातून आलेल्या वऱ्हाडी मंडळींना बागीलगेचे हे वेगळेपण भावते. असा पर्याय आपल्या गावातही असायला हवा, असा विचार मनात येतो. त्या- त्या गावातील नेतेमंडळींनी पुढाकार घेतल्यास गावागावांत असे विवाहसोहळे पार पडतील, यात शंका नाही.

Bagilage Villagers Marriage Ceremony
HSC Result : जुळ्या बहि‍णींनी एकत्र केला अभ्यास अन् बारावी परीक्षेत मिळवलं अनोखं जुळं यश, टक्के वाचून व्हाल शॉक

‘बागीलगे पंचक्रोशी पूर्वीपासून पुरोगामी विचारांची. गाव सधन असले तरी, पैशाची उधळपट्टी नको. त्याचा योग्य वापर करावा हा विचार नव्या पिढीवर रुजवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे. याशिवाय सामाजिक विकासाच्या दृष्टीने अनेक निर्णय घेतले आहेत.

-एस. बी. पाटील (निवृत्त प्राचार्य), ज्ञानेश्वर पाटील, बागिलगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.