नदीपात्रातील अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह विनाअडथळा निर्माण करणे हा महापूर रोखण्याचा पहिला उपाय आहे.
जयसिंगपूर : संभाव्य महापुराच्या (Kolhapur Flood) पार्श्वभूमीवर प्रशासन उपाययोजना करत असताना केंद्रीय जल आयोगाच्या निकषांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. केंद्रीय जल आयोगाच्या (Central Water Commission) निकषांचे तंतोतंत पालन झाल्यास महापुराचा धोका टळू शकतो. कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान यामुळे टळणार आहे.
संभाव्य महापुराच्या तयारीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. पूरबाधित गावातील लोकांची छावण्यांमध्ये सुरक्षित सोय करण्याबरोबरच इतरही बाबींची तयारी केली जात आहे. वास्तविक प्रशासन पातळीवर केंद्रीय जल आयोगाचे निकष कसे पाळले जातील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नदीपात्रातील अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह विनाअडथळा निर्माण करणे हा महापूर रोखण्याचा पहिला उपाय आहे. शासनाने अनेक वर्षांपासून वाळू उपसा झाला नसल्याने वाळू उपसा केल्यास महापुराचा धोका टळू शकेल या भावनेतून वाळू प्लॉटचे लिलाव केले आहेत.
महापुराचे पाणी पंधरा दिवस तुंबून राहते हाच नुकसानीचा मुद्दा आहे. शिरोळ तालुक्यातील ५३ पैकी ४२ गावांना महापुराचा फटका बसतो. शेती, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतेच शिवाय या भागातील जनजीवनही विस्कळीत होते. याचा जनावरे आणि दुधाच्या वाहतुकीवरही परिणाम होतात. तालुक्यातील सुरक्षित गावातील शाळांमध्ये पूरग्रस्तांच्या छावण्या तयार केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही याचे दुष्परिणाम जाणवत आहेत.
एकूणच महापुरात तालुक्यातील जवळपास ९५ टक्के गावातील शाळा बंद राहतात. प्रशासनाकडून संभाव्य महापूर येणार हे गृहीत धरून युद्धपातळीवर उपाययोजना राबवली जात आहे. प्रशासनातील सर्वच घटक यासाठी सक्रिय आहे. महापूर आल्यानंतर उपाययोजना राबवल्या जात असताना महापूर येऊच नये यासाठी याकडे डोळेझाक होत असल्याची भावना पूरग्रस्त गावातील लोकांची आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केंद्रीय जल आयोगाचे निकष तंतोतंत पाळण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक शासनावर दबाव आणण्याची गरज आहे. काही प्रमाणात महापुराचा धोका टळू शकतो. मात्र ‘जखम मांडीला, मलम शेंडीला’ अशी काहीशी अवस्था महापुरावरून निर्माण झाली आहे.
३१ मे धरण क्षमतेच्या १० टक्के
३१ जुलै धरण क्षमतेच्या ५० टक्के
३१ ऑगस्ट ७७ टक्के
१५ सप्टेंबर पुढे पडणारा पाऊस हवामान खात्याचा अंदाज घेऊन १०० टक्के
१० टीएमसी इतका पाणी साठा असावा
५२ टीएमसी इतका पाणी साठा असावा
८०.८५ टीएमसी इतका पाणी साठा असावा
१०५ टीएमसी इतका पाणी साठा असावा
धरण साठा १०० टक्के भरावे.
१२ टीएमसी इतका पाणी साठा असावा
६१.५ टीएमसी इतका पाणी साठा असावा
९४.७१ टीएमसी इतका पाणी साठा असावा
१२३ टीएमसी इतका पाणी साठा असावा
धरण साठा १०० टक्के भरावे.
शिरोळ तालुक्यातील जवळपास ८५ टक्के गावे महापुराच्या विळख्यात सापडतात. आजवरच्या महापुराचा अनुभव लक्षात घेता पंधरा दिवस पाणी गावातच तुंबून राहते. परिणामी, महापुरानंतर शेती, जनावरे, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. महापुरानंतर आरोग्याची समस्या गंभीर होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.