Kolhapur : ..तर संपूर्ण मंडप खाली येवू शकतो, त्यामुळं हा धोका कोणालाही पत्करु देणार नाही; काय म्हणाले जिल्हाधिकारी?

'आम्ही देवस्थानच्या पुजाऱ्यांनाही परवानगी देत नाही, तर त्यांना परवानगी देण्याचा प्रश्‍नच येत नाही'
Collector Rahul Rekhawar
Collector Rahul Rekhawaresakal
Updated on
Summary

‘गरुड मंडपाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गणेश प्रतिष्ठापना करण्याबाबत पर्याय आल्यास त्याचा नक्की विचार केला जाईल. मात्र, अद्याप कोणताही पर्याय आमच्याकडे आलेला नाही.'

कोल्हापूर : ‘माझ्या कामात कुणाचाही हस्तक्षेप नाही. पावसाळा संपण्याआधी गरुड मंडपाच्या कामाची वर्कऑर्डर दिली जाईल आणि पावसाळा संपल्यानंतर गरुड मंडपाचे (Garuda Mandap) काम सुरु हाईल. मात्र, जोपर्यंत त्याचे बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला पर्यायी व्यवस्था शोधावी लागेल, असं स्पष्ट जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं.

यंदाची गणेश प्रतिष्ठापनाही (Ganeshotsav) पर्यायी ठिकाणीच करावी लागणार असल्याचे जिल्हाधिकारी व पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांनी सांगितले. जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘गरुड मंडपाचे बांधकाम पूर्णपणे धोकादायक आहे. लोखंडी खांबाने त्याला आधार दिला आहे. त्यामुळे, आता त्या ठिकाणी कोणतेही काम करणे शक्य नाही. कोणाचा तरी धक्का लागला तरीही संपूर्ण गरुड मंडप खाली येवू शकतो.

Collector Rahul Rekhawar
NCP Crisis : 15 ऑगस्टनंतर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप! राष्ट्रवादीचा मोठा गट अजितदादांसोबत जाणार? जयंत पाटलांचंही नाव चर्चेत

त्यामुळे हा धोका कोणालाही पत्करु देणार नाही. गरूड मंडपात कोणताही धार्मिक कार्यक्रम करता येणार नाही. हे सर्व पुजाऱ्यांना लेखी कळवले आहे. हा मंडप पूर्ण उतरवून नव्याने काम केले जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने पूरातत्व विभागाचे सल्लागारही नेमले आहेत. पुरातत्व विभागाला (Archaeology Department) लागणारा सर्व निधी दिला जाईल. हे खूप गुंतागूंतीचे बांधकाम आहे. ’

Collector Rahul Rekhawar
Loksabha Election : लोकसभा जवळ येताच पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसकडून मोठा बदल; 'या' नेत्यांना दिली महत्वाची जबाबदारी

‘गरुड मंडपाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गणेश प्रतिष्ठापना करण्याबाबत पर्याय आल्यास त्याचा नक्की विचार केला जाईल. मात्र, अद्याप कोणताही पर्याय आमच्याकडे आलेला नाही. आता फक्त गरुड मंडपापुरतीच चर्चा झाली. त्याबद्दल त्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. आम्ही देवस्थानच्या पुजाऱ्यांनाही परवानगी देत नाही, तर त्यांना परवानगी देण्याचा प्रश्‍नच येत नाही, असेही रेखावार म्हणाले.

Collector Rahul Rekhawar
Koyna Dam : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' कोयना धरण भरण्यास लागणार उशीर; किती आहे साठा? 'इतकंच' भरलंय धरण

कुणाच्याही पोटावर पाय नाही...

कॉरिडॉर करताना कोणत्याही व्यावसायिक किंवा व्यापाऱ्याच्या पोटावर पाय आणले जाणार नाहीत. सर्वांची व्यवस्था झाल्यानंतरच पुढील कारवाई होईल. कोणीही कोणतीही भिती किंवा शंका बाळगू नये. कोणाला शंका असतील किंवा सूचना असतील तर निश्‍चितपणे द्याव्यात. यासाठी अनेक लोकांची सहमती आलेली आहे. सध्या माऊली लॉजच्या जमिनीचे संपादनाचे काम सुरु असल्याचेही रेखावार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()