'त्या' पाण्यामुळं ओढावतं कोल्हापूर, सांगलीत महापुराचं संकट; पाटबंधारे विभागाच्या धरण पाणी अभ्यासकांचं काय आहे मत?

कोयना, चांदोली व राधानगरी धरणात (Koyna Dam) अल्प पाणीसाठा आहे.
Kolhapur Sangli Flood
Kolhapur Sangli Floodesakal
Updated on
Summary

दोन वर्षांत केंद्रीय जलआयोगाच्या शिफारशीनुसार उन्हाळ्यात कोयना, राधानगरी, चांदोली धरणातील पाणी किमान ठेवण्याची अंमलबजावणी केली.

कोल्हापूर : ‘‘कोयना, चांदोली व राधानगरी धरणात (Koyna Dam) अल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे कितीही दमदार पाऊस पडला तरी धरणे भरण्यासाठी ऑगस्टअखेर होईल. त्यानंतर पावसाचा जोरही कमी होतो. धरणविरहित क्षेत्रातील पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता नदीपात्रात नैसर्गिकरित्या असते. त्यामुळे यंदा कितीही पाऊस वाढल्यास नैसर्गिक पूर येईल; पण महापुराची (Kolhapur Flood) चिंता नाही. फक्त धरणातील पाणी सोडण्याच्या नियोजनाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल,’’ असे पाटबंधारे विभागाचे (Irrigation Department) धरण पाणी अभ्यासक निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

यंदा उन्हाळा तीव्र झाला. त्यामुळे पाऊसमानही वाढेल, असा अंदाज हवामान विभागासह (Department of Meteorology) तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे पाऊस वाढल्यास महापुराची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर श्री. दिवाण यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘‘अलमट्टी धरण व हिप्परगी धरणातील पाणीसाठा नियोजनापेक्षा जास्त असणे यातच कोयना, धरण, चांदोली, राधानगरी धरणात उन्हाळ्यातच जास्त पाणीसाठा असेल. जुलैमध्ये पाऊस वाढल्यास धरणे तातडीने भरतात. कोयनेतून पाणी सोडले जाते.

Kolhapur Sangli Flood
मोठी बातमी! फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची जुनी अप्रकाशित बखर; नेमकं काय आहे बखरीत आणि कशी मिळाली ही बखर?

अलमट्टी व हिप्परगीमधून पाणी अपेक्षित प्रमाणात सोडले नसल्यास कोयना धरणातून कृष्णेत येणारे पाणी अलमट्टीकडे सहजपणे जात नाही. ते पाणी महाराष्ट्राच्या सीमेवर अडते. यात चांदोली, राधानगरी धरणाची पाणी सोडल्यानंतरही वारणा व पंचगंगा नदीचे पाणी कृष्णा नदीला मिळते. त्या पाण्याची फुग तयार होते आणि कोल्हापूर, सांगलीत महापुराचे संकट ओढावते. असा अनुभव २०१९ व २०२१ चा होता.

ते म्हणाले, ‘‘दोन वर्षांत केंद्रीय जलआयोगाच्या शिफारशीनुसार उन्हाळ्यात कोयना, राधानगरी, चांदोली धरणातील पाणी किमान ठेवण्याची अंमलबजावणी केली. परिणामी गतवर्षी पूर आला, पण महापूर नाही. यंदाही तीच अंमलबजावणी झाली. तरी अलमट्टी व हिप्परगी धरणातील विसर्गही केंद्रीय जलआयोगाच्या शिफारशीनुसार होणे यावरही लक्ष ठेवून लागेल.’’

Kolhapur Sangli Flood
Anuskura Ghat : पश्‍चिम महाराष्ट्राशी जोडणारा अणुस्कुरा घाटातला प्रवास ठरतोय जीवघेणा; घाटमार्गात कोसळताहेत दरडी

धरणाचे नाव क्षमता सध्याचा साठा

  • कोयना धरण १०५ टीएमसी १० टीएमसी

  • चांदोली धरण ३७ टीएमसी ३ टीएमसी

  • राधानगरी धरण ७ टीएमसी २ टीएमसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.