'जे भाजपमध्ये नाहीत, त्यांना पक्षातून विधानसभेची उमेदवारी कशी मिळणार?' माजी आमदाराचा थेट सवाल

'विधानसभा निवडणूक (Assembly Elections) ‘कमळ’ चिन्हावर लढवली जाणार आहे.'
former MLA Suresh Halvankar
former MLA Suresh Halvankaresakal
Updated on
Summary

इचलकरंजीमध्ये आमदार व महापालिकेमध्ये महापौर हा भाजपचा असणार आहे. विरोधकांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देऊ नका.

इचलकरंजी : ‘जे भाजपमध्ये नाहीत त्यांना पक्षातून विधानसभेची उमेदवारी कशी मिळणार’, असा सवाल माजी आमदार सुरेश हाळवणकर (Suresh Halvankar) यांनी उपस्थित केला. शहर भाजप कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ‘संभाव्य उमेदवारीच्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने कामाला लागावे’, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

हाळवणकर म्हणाले, ‘विधानसभा निवडणूक (Assembly Elections) ‘कमळ’ चिन्हावर लढवली जाणार असून त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत. इचलकरंजीमध्ये आमदार व महापालिकेमध्ये महापौर हा भाजपचा असणार आहे. विरोधकांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देऊ नका. या निवडणुकीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल. कोणीही कितीही दावा केला तरी लोकसभा निवडणुकीतील यश हे भाजपच्या कार्यकर्त्यांचे आहे.’

former MLA Suresh Halvankar
'महायुती-मविआ'कडून छोट्या राजकीय पक्षांना संपविण्याचा प्रयत्न; जयंत पाटलांच्या पराभवानंतर राजू शेट्टींचा आरोप

यावेळी विजय भोजे, जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, धोंडिराम जावळे आदींनी मनोगत व्यक्त केले. बैठकीत बूथ रचनात्मक काम, पक्षीय संघटनात्मक कामकाज, नव मतदार नोंदणी अभियान, नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पातील विविध योजना, शासनाने घेतलेले निर्णय अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी अमृत भोसले, मिश्रीलाल जाजू, राजेश रजपुते, अश्विनी कुबडगे, विनोद कांकाणी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.