Hasan Mushrif : शेतकऱ्यांना भूमिहीन बनविणारा 'हा' महामार्ग रद्द करावा लागेल; कोणत्या महामार्गाबाबत बोलले मुश्रीफ?

प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) जिल्ह्यातील सुमारे ४० गावांमधून जातो.
Minister Hasan Mushrif Shaktipeeth Highway
Minister Hasan Mushrif Shaktipeeth Highwayesakal
Updated on
Summary

पर्यायी महामार्गही नकोच महाराष्ट्रात आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे आधीपासूनच अधिक मजबूत आहे.

कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) जिल्ह्यातील सुमारे ४० गावांमधून जातो. या महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याचे संकट आहे. त्यामुळे हा महामार्ग रद्दच करावा लागणार आहे. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन बनविणारा हा महामार्ग रद्द होण्यासाठी प्रसंगी सर्वपक्षीय व्यापक जनआंदोलन उभारावे लागेल, अशा भावना वैद्यकीय शिक्षण मंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केल्या.

Minister Hasan Mushrif Shaktipeeth Highway
Kolhapur Lok Sabha : 'या' प्रमुख नेत्यांच्या गावांतच मंडलिक पिछाडीवर; कारखाना संचालकांच्या गावांतही मताधिक्य नाही

पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकसभेच्या निकालाबाबत कारणमीमांसा करण्यासाठी मुंबईत पक्षाची बैठक घेतली होती. त्यामध्ये शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या नाराजी व संतापाला सामोरे जावे लागण्याचे प्रमुख कारण आपण स्पष्ट केले. ही बाब उपमुख्यमंत्री पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही निदर्शनास आणून दिली.

दरम्यान, या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूरवरून सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही. दरम्यान, माजी खासदार संजय मंडलिक यांनीही मुंबईत झालेल्या शिवसेना- शिंदे गटाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याविषयी चर्चा केली आहे.

Minister Hasan Mushrif Shaktipeeth Highway
Sanjay Telnade : विधानसभेची तयारी करणाऱ्या ST गँगचा म्होरक्या संजय तेलनाडेसह सात जणांवर हद्दपारीची कारवाई

पर्यायी महामार्गही नकोच महाराष्ट्रात आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे आधीपासूनच अधिक मजबूत आहे. त्यामुळे या नवीन महामार्गाची आवश्यकता नाही. तसेच हा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करून पर्यायी मार्ग करा, असे म्हणणेही संयुक्तिक आणि योग्य नाही. प्रसंगी कोणतीही किंमत मोजून हा महामार्ग रद्द करण्यासाठी प्रयत्न करू, असे मुश्रीफ यांनी या पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.