Vegetable Rate : कांदा 70 तर, बटाटा 40 रुपये किलो; भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ, इतर भाज्यांचे दर किती?

Vegetable Prices : पावसाचा जोर कमी झाल्यानंतर बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे.
Vegetable Prices
Vegetable Pricesesakal
Updated on
Summary

टोमॅटोही बाजारात (Vegetable Market) मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. मात्र, दर अजूनही चाळिशीत आहे.

कोल्हापूर : पावसाचा जोर कमी झाल्यानंतर बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. मेथी, शेपू, कांदापात, कोथिंबिरीचे (Coriander) दरही पेंडीला वीस ते पंचवीस रुपये इतका आहे. तर दोडका, कारली, पडवळ, दुधी भोपळा, फ्लॉवरचे दर चाळीस ते पन्नास रुपये किलो असा आहे.

टोमॅटोही बाजारात (Vegetable Market) मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. मात्र, दर अजूनही चाळिशीत आहे. उत्तर कर्नाटकातून रताळांचीही आवक वाढली असून, दरही ४० ते ६० रुपये प्रतिकिलो असा भाव आहे. गेले कित्येक दिवस कोथिंबीर चाळीस ते पन्नास रुपये पेंडी असा भाव होता. तोच दर वीस ते पंचवीस रुपये असा सुरू आहे. मेथीचीही आवक मोठ्या प्रमाणात झाली असून, दरही २० रुपये पेंडी असा दर आहे. वांग्याचीही आवक मोठ्या प्रमाणात झाली असून, प्रतिकिलोचा दर ३० ते ४० रुपये असा आहे. गवारीचा भाव अजूनही ६० ते १०० रुपये किलो आहे.

Vegetable Prices
King Cobra Snake : चंदगड तालुक्यात आढळला तब्बल बारा फूट लांबीचा 'किंग कोब्रा'

सीताफळ, पेरू, सफरचंद आवक वाढली

नव्या फळांची आवक बाजारात वाढली आहे. विशेषतः पेरू, सीताफळ आणि काश्‍मिरी सफरचंदाची आवक झाली आहे. दरही आवाक्यात आहेत.

Vegetable Prices
Sharad Pawar : 'रिझर्व्ह बँके'च्या चुकीच्या धोरणामुळे 500 हून अधिक बँका बंद पडल्या; असं का म्हणाले शरद पवार?
Vegetable Prices
Vegetable Pricesesakal

नवा कांदा बाजारात येण्यास उशीर

पावसामुळे नवा कांदा बाजारात येण्यास उशीर असल्याने उपलब्ध कांद्याचे भाव वाढले आहे. त्यामुळे कांदा सत्तर रुपये किलो, तर इंदोरी बटाटा ५० रुपये किलो आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.