खिद्रापूर परिसरात वाढतेय मगरींची संख्या

Increasing Number Of Crocodiles In Khidrapur Area Kolhapur Marathi News
Increasing Number Of Crocodiles In Khidrapur Area Kolhapur Marathi News
Updated on

इचलकरंजी : शिरोळ तालुक्‍यातील खिद्रापूर, सैनिक टाकळी येथील कृष्णा नदीचा परिसर मगरींच्या वास्तव्यासाठी हॉटस्पॉट बनले आहे. या भागात मगरींना सुरक्षित वातावरणाबरोबरच त्यांना आवश्‍यक मुबलक अन्न मिळत असल्याने त्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना भविष्यात नेहमी दक्ष राहून या मगरींच्या अधिवासाला फारसा हस्तक्षेप टाळण्याची गरज आहे. 

शिरोळ तालुक्‍यात यापूर्वीही महापुरात सैनिक टाकळी, खिद्रापूर या परिसरात मगरीचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आढळले होते. अनेक मगरी थेट शेतामध्येच होत्या. तब्बल 12 फुटांपर्यंतच्या मगरी या परिसरात आढळल्या होत्या. महापूर ओसरल्यानंतर सातत्याने परिसरातील गावांमध्ये मगरीचे दर्शन शेतकऱ्यांना झाले आहे. केवळ तात्पुरते नव्हे तर सुरक्षित स्थळ म्हणून मगरींनी या परिसरात वास्तव्य ठेवल्याचे सिद्ध झाले आहे. काल या परिसरात तब्बल 8 नवीन जन्मलेली पिल्ले नुकतीच आढळली आहेत.

अभ्यासकांच्या मते किमान येथे 30 ते 40 पिल्ले जन्मली असावीत. निदर्शनास येण्यापूर्वीच अन्य पिलांना मगरीने पाण्यात सोडल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. कृष्णा आणि पंचगंगा नदीचे पात्र आता मगरींसाठी अधिक सुरक्षित बनले आहे. सैनिक टाकळी, खिद्रापूर पाठोपाठ हेरवाड, अब्दुललाट, इचलकरंजी या ठिकाणच्या पंचगंगा नदीच्या पात्रातही मगरीचे वास्तव्य आढळले आहे. त्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीचे पात्र मगरीच्या आधिवासासाठी हॉटस्पॉट बनले आहे. 

पाण्यामध्येच खाद्य 
मगरींना कृष्णा आणि पंचगंगा नदी पात्रात मुबलक खाद्य मिळत आहे. त्यामुळेच ते या ठिकाणी सुरक्षित राहिले आहेत. विशेष बाब म्हणजे पाण्यामध्येच त्यांना माशाच्या माध्यमातून खाद्य मिळत असल्याने ते पाळीव प्राण्यावर अथवा माणसावर हल्ला केल्याची घटना आढळून येत नाही. 

मगर आक्रमक होण्याची शक्‍यता
मगरीचा अधिवास कृष्णा आणि पंचगंगा नदी पात्रात कायम असणार आहे. त्यामुळे त्यांच्या आधिवासामध्ये फारसे हस्तक्षेप न करता नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. खिद्रापूर परिसरात ज्या मगरींनी पिल्लांना जन्म दिला आहे ती मगर आक्रमक होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षितपणे त्या भागात फिरावे. 
- दिग्वीजय कित्तुरे, प्राणीमित्र 

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.