Independence Day : मला नेहमीच कोल्हापूरकरांचा अभिमान वाटत राहिलाय; असं का म्हणाले अजितदादा?

मला नेहमीच कोल्हापूरकरांचा अभिमान वाटत राहिला आहे.
NCP Ajit Pawar
NCP Ajit PawarEsakal
Updated on
Summary

शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीकविमा योजना सुरु केली आहे. जगाच्या इतिहासात अशी योजना कोणीही सुरु केली नव्हती.

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते कोल्हापुरात नुकतेच पार पडले.

यावेळी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस बरा असला तरी, पिकांना जेवढा पाऊस हवा होता, तेवढा मिळाला नाही. आज देखील आपल्या राज्यातील काही भागात टॅंकर सुरु करावे लागताहेत.

NCP Ajit Pawar
Loksabha Election : माढ्याचा पुढील खासदार काँग्रेस पक्षाचाच असेल; माजी मुख्यमंत्र्यांचं थेट भाजपलाच चॅलेंज

माझा शेतकरी, कष्टकरी वाचला पाहिजे म्हणून सरकार सातत्यानं लक्ष ठेवून आहे. कांदा उत्पादकांसाठी सरकारनं साडेपाचशे कोटी मंजूर केले आहेत. शिवाय, शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीकविमा योजना सुरु केली आहे. जगाच्या इतिहासात अशी योजना कोणीही सुरु केली नव्हती, ती योजना आपण आपल्या राज्यात सुरु केली आहे.

NCP Ajit Pawar
Shivsena Politics : एकनाथ शिंदे सुद्धा 'मातोश्री'वर माफी मागायला आल्यास..; राऊतांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलं मोठं विधान

मला नेहमीच कोल्हापूरकरांचा अभिमान वाटत राहिला आहे. मी ज्यावेळी ऊर्जामंत्री होतो, त्यावेळी सगळ्यात चांगल्या पध्दतीनं विजेचा पैसा देणारी सर्वसामान्य जनता कुठली असेल तर ती म्हणजे, कोल्हापूरची. वेळेत परत फेड करणारी लोक इथं आहेत. अतिशय चांगल्या पध्दतीनं योजनांचा वापर करणारी लोक माझ्या कोल्हापुरात आहेत. त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचे अजितदादांनी सांगितले.

NCP Ajit Pawar
Kolhapur : भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसला मोठी संधी; 'या' दोन बड्या नेत्यांनी एकजूट दाखवली तर बदलणार संपूर्ण चित्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.