Indian Jawan : सुटीवर आलेल्या जवानावर काळाचा घाला; थांबलेल्या ट्रकच्या धडकेत जवान जागीच ठार

चार दिवसांपूर्वीच तो सुटीवर आला होता. बुधवारी सायंकाळी आपल्या मित्रांसोबत मोटारसायकलवरुन निपाणीस गेला होता.
Indian Jawan Yogesh Dattwade Died
Indian Jawan Yogesh Dattwade Diedesakal
Updated on
Summary

रात्री दहाला जेवण करून परत येत असताना व पाऊस सुरू असल्याने घसरून निपाणी राष्ट्रीय महामार्गावर चव्हाण मळ्याजवळ थांबलेल्या ट्रकवर योगेशची मोटारसायकल धडकली. यात तो जागीच ठार झाला.

खडकलाट : आसाम येथे १० मद्रास बटालियनमध्ये (Madras Battalion) सेवा बजावत असलेला व चार दिवसांपूर्वी सुटीवर आलेला नवलिहाळ येथील जवान (Indian Army) अपघातात मृत्यू झाला. योगेश आप्पासाहेब दत्तवाडे (वय २४, रा. नवलिहाळ, ता‌‌. चिक्कोडी) असे मृत जवानाचे नाव आहे.

निपाणी येथील चव्हाण मळ्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर (ता. २८) रात्री दहाला हा अपघात झाला. योगेश आप्पासाहेब दत्तवाडे याचे मूळगाव तपकारवाडी असले तरी लहानपणीच वडील वारल्यामुळे आपल्या आईसोबत आपला मामा काकासाहेब खड्ड (रा. नवलिहाळ) यांच्याकडे रहात होता.

Indian Jawan Yogesh Dattwade Died
Bus Accident : किंकाळ्या, आरोळ्या अन् मृत्यूचं तांडव! बुलढाण्यात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, कशी घडली दुर्घटना?

दहावीपर्यंतचे शिक्षण नवलिहाळ येथे, तर आयटीआय चिक्कोडी येथे पूर्ण केल्यानंतर चार वर्षांपूर्वी आसाम १० मद्रास बटालियनमध्ये जवान म्हणून रुजू झाला होता. चार दिवसांपूर्वीच तो सुटीवर आला होता. बुधवारी सायंकाळी आपल्या मित्रांसोबत मोटारसायकलवरुन निपाणीस गेला होता.

Indian Jawan Yogesh Dattwade Died
मन हेलावून टाकणारी घटना! बस अपघातात 25 लोक जिवंत जळाले, 'दुभाजक' ठरलं दुर्घटनेचं कारण

रात्री दहाला जेवण करून परत येत असताना व पाऊस सुरू असल्याने घसरून निपाणी राष्ट्रीय महामार्गावर चव्हाण मळ्याजवळ थांबलेल्या ट्रकवर योगेशची मोटारसायकल धडकली. यात तो जागीच ठार झाला. निपाणी शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षका उमादेवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. गुरुवारी उत्तरीय तपासणी केल्यानंतर नवलिहाळ येथे सायंकाळी पाचला योगेश याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Indian Jawan Yogesh Dattwade Died
Karwar : पत्नी, मुलाला नदीत ढकलून व्यावसायिकानं स्वत: लावून घेतला गळफास; घटनेने कारवारात खळबळ

यावेळी योगेश जवान म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या बटालियनमधील अधिकारी, सहकारी जवान, चिक्कोडीचे तहसीलदार सी. एस. कुलकर्णी, नवलिहाळ येथील ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, येथील पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बी. डी. कोतवाल, पोलिस कर्मचारी, यांच्यासह नवलिहाळ उपस्थित होते. योगेश याच्या मागे आई, बहीण, मामा, मामी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.