सुशीलकुमार बाबू खोत त्याचे वडील गुजरात येथे पोलिस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाले आहेत. तर त्याचा लहान भाऊ सचिन हा देखील सैन्य दलात सेवा बजावत आहे.
मलिकवाड : बेळगाव (Belgaum) जिल्ह्यातील सैनिकी गाव म्हणून ओळखले जाणाऱ्या मलिकवाड (ता. चिक्कोडी) येथील जवानाचे सेवेत असताना निधन झाले आहे. सुशीलकुमार बाबू खोत (वय ४३) असे आसाम येथे सेवेत असताना निधन झालेल्या जवानाचे (Indian Army) नाव आहे.
निधन कशामुळे झाले, याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. आज सकाळी जवानाचे (Sushilkumar Khot) पार्थिव मलिकवाड येथे येणार आहे. सुशीलकुमार हा अटलरी रिजिमेंटमध्ये (Artillery Regiment) गेली २३ वर्षे सेवा बजावत आहे. तो सध्या हवालदार रँक (पोस्ट) कार्यरत असताना मिसामारी कॅम्पमध्ये सेवारत होता. या काळात त्याचे निधन झाले आहे.
शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सुशीलकुमार याच्या रेजिमेंटमधून याची माहिती मिळाली असली तरी त्यांच्या घरच्यांना याची माहिती शुक्रवारी रात्रीपर्यंत देण्यात आलेली नव्हती. सुशीलकुमार बाबू खोत त्याचे वडील गुजरात येथे पोलिस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाले आहेत. तर त्याचा लहान भाऊ सचिन हा देखील सैन्य दलात सेवा बजावत आहे.
त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. आज, शनिवारी (ता. १६) सकाळी साडेआठ वाजता बेळगाव (सांबरा) विमानतळावर पार्थिव येणार असून तेथून वाहनाने मलिकवाड येथे येणार आहे. सकाळी अकरा वाजता मलिकवाड जय हिंद असोसिएशनच्या कमानीपासून गावात अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.