कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचार सभेत एक विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर टीकेचं धनी व्हावं लागलं आहे. यावर कोल्हापूरस्थित इतिहासतज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांनी देखील आक्षेप घेतला असून शहांच्या विधानामागं एक विशिष्य व्यूहरचना असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.