हत्ती प्रतिबंधक चरी ठरल्‍या कुचकामी

भुदरगड तालुक्यात लाखो रुपये वाया; नव्याने केवळ चार गावांचे प्रस्ताव
kolhapur
kolhapursakal
Updated on

पिंपळगाव : भुदरगड तालुक्यातील वन हद्दीत खोदाई केलेल्या हत्ती प्रतिबंधक चरी पूर्ण बुजल्या आहेत. शासनाने लाखो रुपये खर्चून घेतलेल्या या चरी कुचकामी ठरल्या आहेत. तालुक्यातील केवळ चार गावांतील अरण्य क्षेत्रातून नव्या हत्ती प्रतिबंधक चरीच्या खोदाईचे शासनाच्या वन विभागाकडे प्रस्ताव दाखल आहेत. भुदरगड तालुक्यातील बहुतांशी गावे वन हद्दीला लागून आहेत. ५० पेक्षा अधिक गावची शेतजमीन वन हद्दीला जोडून आहे. अनेक गावांत हत्ती, रानगवे या वन्यप्राण्यांचा उपद्रव सुरूच आहे. वन हद्दीजवळील गाव शिवारात बिबट्या, रानडुक्कर, हत्ती, रानगवे, तरस या वन्यप्राण्यांचा वावर सुरू आहे.

kolhapur
‘ईडी’ कारवाईवरून पंजाबमध्ये वाक्‌युद्ध

भुदरगड तालुक्यातील(bhudargad taluka) मुरुक्टे येथील अरण्य क्षेत्राच्या बाजूने २००५ ला हत्ती प्रतिबंधक चरींची खोदाई केली होती. या चरींमुळे पुढील १० वर्षे वन्यप्राण्यांचा उपद्रव काही अंशी कमी झाला होता. अरण्य क्षेत्राजवळील शेता शिवारात शेतकरी रात्री राखण करतात. काही वेळा गव्याच्या हल्ल्यात शेतकरी मारले गेले, तर काही शेतकऱ्यांनी गव्यांच्या त्रासाला कंटाळून शेतात पीक घेणेच बंद केले आहे.

kolhapur
स्थानिकांना बंदी; घुसखोर मच्छीमारांना संधी

यावर्षी हेळेवाडी, निष्णप, नागणवाडी येथील शेतकरी गव्याच्या(bufelo) हल्ल्यात जखमी झाले होते. शेतकरी व शेती सुरक्षिततेच्या दृष्टीने नव्याने हत्ती प्रतिबंधक(elephant) चरी खोदाई होणे आवश्यक आहे. भुदरगड तालुक्यातील केळेवाडी, करडवाडी, शेणगाव, गारगोटी येथील शेतकऱ्यांना गव्याच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले आहेत. गिरगाव येथील सुभाष देसाई गव्याच्या हल्ल्यात जखमी झाले होते. तालुक्यातील वन्यप्राण्यांचा जास्त त्रास होणाऱ्या गावांचा सर्व्हे करून वन हद्दीवरून नवीन जास्त खोलीच्या हत्ती प्रतिबंधक चरींची खोदाई आवश्यक आहे.

kolhapur
समाजवादी पक्षात सुरुंग! मुलायम घराण्यातील सुनेचा भाजपात प्रवेश

भुदरगड तालुक्यातील(bhudargad taluka) हेळेवाडी, नागणवाडी, निष्णप येथील अरण्य क्षेत्रातील वन हद्दीवर हत्ती (elephant)प्रतिबंधक चरींची खोदाई करण्यासाठी शासनाच्या वन विभागाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. तालुक्यातील बऱ्याच गावच्या वन हद्दीवर चरींची आवश्यकता आहे.

-किशोर अहिर,

परिक्षेत्र वनाधिकारी, भुदरगड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.