GST : जीएसटी रद्दचे आश्वासन हवेतच

खाद्यान्नावरील करामुळे सर्वसामान्यांना खिश्याला कात्री
Inflation Central Govt five percent tax on food
Inflation Central Govt five percent tax on food
Updated on

कोल्हापूर : खाद्यान्नावर केंद्र शासनाने लादलेला पाच टक्के जीएसटी अखेर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारा ठरत आहे. त्यामुळे २५ किलोच्या आतील पॅकिंग वस्तूसह ब्रॅण्डेड वस्तूंवर प्रत्येक ग्राहकाला पाच टक्के जीएसटी द्यावा लागतो. हा जीएसटी रद्द करू, अशी आमदार, मंत्री, खासदार, मुख्यमंत्री यांच्यासह स्थानिक तसेच राज्यस्तरीय चेंबर ऑॅफ कॉमर्स या व्यापाऱ्यांच्या संघटनांकडूनही दिलेली आश्‍वासने हवेत विरली आहेत. ग्राहकांना याचा थेट भुर्दंड बसत आहे. आगामी सणासुदीत याचा मोठा फटका ग्राहकांना दिसून येणार आहे.

खाद्यान्नावर पाच टक्के जीएसटी लावल्यामुळे हजारांच्या खरेदीवर ५० रुपयांची वाढ झाली. प्रत्येक कुटुंबीयांचा मासिक अन्नधान्यावरील खर्च पाहता तो ४ ते ५ हजार असतो. त्यांना मासिक अडीच ते तीनशे रुपये भुर्दंड बसतो. पाच टक्क्यांनी वाढलेला हा कर भविष्यात आणखी वाढू शकतो, अशीही भीती दुकानदारांनी व्यक्त केली. विशेष करून मार्ट, मॉल, हायपर मार्केटमधून खरेदी करणाऱ्यांना याचा फटका अधिक बसू लागला आहे.

गूळ विक्रेत्यांना फटका

कोल्हापूर जिल्हा गूळ उत्पादक म्हणून देशात प्रसिद्ध आहे. गुळाचा सौदा खुल्या पद्धतीने होतो. तो गोदामात साठवून अन्य राज्यात, जिल्ह्यात पाठविला जातो. त्यावर जीएसटी आकारला जातो. गुळाचा रवा २० किलोवर निघत नाही. तोच रवा २५ किलोपुढे तयार झाल्यास जीएसटीतून वगळू शकते. मात्र, रव्याचे वजन वाढू शकत नाही. त्यामुळे याचाही फटका गूळ विक्रेते आणि उत्पादकांनाही बसतो.

खाद्यान्नावरील जीएसटीचा फटका असा...

  • धान्य - पूर्वीचा दर - जीएसटीमुळे

  • गहू १० किलो - २८० रुपये - २९२ रुपये

  • ज्वारी १० किलो - ४८० - ५०० रुपये

  • तांदूळ १० किलो - ४४० - ४६०-६५ रुपये

  • तूरडाळ २ किलो - २०० - २४० रुपये

  • हरभरा डाळ २ किलो - १३४ रुपये - १४२-४३ रुपये

२५ किलोच्या खालील पॅकिंगच्या आणि ब्रॅण्डेडच्या वस्तूंनाच जीएसटी आकारला जातो. शक्यतो सर्वसामान्य व्यक्ती २५ किलोच्या खालीच खरेदी करते. त्यालाच जीएसटी सोसावा लागतो. घाऊक विक्रेत्यांना आणि अधिक खरेदीदारांना नाही; पण सर्वसामान्यांना भुर्दंड अशी स्थिती जीएसटीमुळे बाजारात आहे.

- संदीप वीर, किरकोळ किराणा दुकानदार.

‘लिगल मेट्रॉलाजी २००९’चा समावेश जीएसटीच्या परिपत्रकात केला आहे. त्यानुसार वस्तू पॅकिंग करून विकायच्या आहेत. पॅकिंगवर वजन, उत्पादन तारीख, घटक यासह अन्य माहिती द्यावयाची आहे. किरणा सुट्टा विकल्यास जीएसटी नाही म्हणून सांगितले जाते. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापर्यंत निवेदने दिली. मात्र, जुमानले नाही.

- संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज

किराणा माल दुकानदाराने ग्राहकांसमोर वजन करून पॅकिंग करून वस्तू दिल्यास त्याला जीएसटी लागत नाही. मात्र, असे करणे शक्य होत नाही. परिणामी, किराणा दुकानदार पाच, दहा किलोचे पॅकिंग करून ठेवतो, असे पॅकिंग करून ठेवलेली वस्तू विक्री केल्यास त्यावर जीएसटी लागू आहे.

- बबन महाजन, किराणा माल दुकानदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.