कोल्हापूरच्या डावखुऱ्यांची उजवी कामगिरी; प्रत्येक क्षेत्रात वेगळी ओळख

कोल्हापुरातल्या डावखुरे त्याच वाटेवर चालणारे आहेत. त्यांचा घेतलेला हा शोध.
International-Left-Day
International-Left-Dayesakal
Updated on

कोल्हापूर : डाव्या हाताने काम करणारे डावखुरे. प्रत्येक क्षेत्रात त्यांची वेगळी ओळख. एखाद्याचे ‘डावरं’ म्हणून नाव घेतलं की, त्याचा चेहरा पटकन डोळ्यांसमोर येतो. (International-Left-Day) हे डावखुरे लोक विशेष ओळख तयार करून आपापल्या क्षेत्रात स्वतःचे स्थान भक्कम करतात. कोल्हापुरातल्या (kolhapur) डावखुरे त्याच वाटेवर चालणारे आहेत. त्यांचा घेतलेला हा शोध.

२१ शतके, २५० विकेट्स

डावखुरा अष्टपैलू क्रिकेटपटू रोहित पाटील मुंबई (mumbai) १७ वर्षांखालील, महाराष्ट्र १९ वर्षांखालील, महाराष्ट्र प्रीमियर लीग, (maharashtra premier league)ओडिशा प्रीमियर लीगसह शालेय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा खेळला आहे. त्याने आतापर्यंत विविध स्पर्धांतून २१ शतके, ५५ अर्धशतके केली असून २५० विकेट्स मिळविल्या आहेत. सध्या तो मुंबईतील एमआयजी क्लबकडून खेळत आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमशी तो करारबद्धही झाला होता. तो मूळचा कोल्हापूरचा असून, प्रशिक्षक सदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घडला आहे.

Rohit patil
Rohit patil esakal
International-Left-Day
जयसिंगपूरच्या पठ्ठ्याचा नादच खुळा! 'IT' जॉब सोडून जाहिरातीत ठसा

३५ एकांकिकांचे केले दिग्दर्शन

शंतनू पाटील बालाजी पार्क येथील रहिवासी असून, भारती विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. गेली दहा वर्षे तो नाट्य दिग्दर्शक म्हणून काम करत असून, आजपर्यंत त्याने सुमारे ३५ एकांकिकांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच सहा नाटके दिग्दर्शित केली आहेत. राज्यभरात झालेल्या विविध स्पर्धांत सुमारे चौदा एकांकिकांनी बक्षिसे मिळवली आहेत. शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित ‘गगन दमामा बाजो’ म्युझिकल (gagan damama bajo musical play) नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. हे मराठीतील शहीद भगतसिंगांच्या जीवनावरील पहिलेच म्युझिकल नाटक आहे. शंतनूचे लँड स्किपिंगमध्ये कौशल्य आहे.

मूर्तिकार अन् फुटबॉल खेळाडू

ओंकार विजय पुरेकर लहानपणापासून डावखुरा. गणेशमूर्ती तयार करण्यात त्याचं कुटुंब व्यस्त असते. ओंकारही मूर्ती तयार करतो. तो डावखुरा असल्याने मूर्ती तयार करण्यात त्याचे विशेष कौशल्य आहे. जे उजवे आहेत, त्यांना मूर्तीकामात जे जमत नाही ते तो अधिक चांगल्या पद्धतीने काम करतो. प्लास्टरच्या मूर्ती तयार करून त्यांना रंगही देतो. तो शाहूपुरी स्पोर्टसचा फुटबॉल खेळाडू असून, नऊ वर्षे तो या संघाकडून खेळत आहे. तो चांगला फुटबॉल म्हणूनही ओळखला जातो. शाहूपुरीतील सातव्या गल्लीत तो राहतो.

International-Left-Day
रणधुमाळी; जिल्हा बँकेची प्रारूप यादी प्रसिद्धीची तारीख ठरली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.