Kolhapur Riots : कोल्हापुरात दंगल घडवणाऱ्या दोषी व्यक्तीला सोडणार नाही; अप्पर पोलिस महासंचालकांचा इशारा

दंगलीच्या (Kolhapur Riots) घटनेची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.
Kolhapur Band
Kolhapur Bandesakal
Updated on
Summary

औरंगजेबाच्या आक्षेपार्ह स्टेटस लावल्याने शहरात दोन दिवस दंगल झाली. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना कोल्हापुरात आले होते.

कोल्हापूर : दंगलीच्या (Kolhapur Riots) घटनेची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये फोटो, व्हिडिओ त्याचबरोबर संशयितांचे जबाबही तपासले जात आहे. सर्व पैलूंची तपासणी केल्यानंतरच या घटनेबद्दल निश्‍चित भाष्य करता येईल. कोणत्याही दोषी व्यक्तीला सोडले जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना (Sanjay Saxena) यांनी केले.

Kolhapur Band
Kolhapur Band : कोल्हापुरात परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर; चौकाचौकांत पोलिसांचा कडक बंदोबस्त

काल त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहाणी केली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. औरंगजेबाच्या आक्षेपार्ह स्टेटस लावल्याने शहरात दोन दिवस दंगल झाली. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना कोल्हापुरात आले होते. मुंबईहून ते बेळगावला विमानाने आले. तेथून ते पोलिस मुख्यालयात आले. येथे त्यांनी झालेल्या घटनेची माहिती घेतली.

Kolhapur Band
Kolhapur Riots : दंगल उसळली असताना ZP चा मोठा निर्णय; 'त्या' 69 मुस्लिम मुलांना पाठवणार बिहारला!

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, सीपीआर चौक, दसरा चौक या ठिकाणी त्यांनी मोटारीतून पाहणी केली. पाहणीनंतर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर सक्सेना म्हणाले, ‘दंगलीचे सर्व पैलू आम्ही तपासत आहोत. निश्‍चि‍त माहिती समोरआल्यावरच निष्कर्ष काढता येईल.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()