महापालिका आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दवाखान्यात जाऊन झालेल्या प्रकाराची चौकशी केली.
कोल्हापूर : औषधे (Medicines) घेण्यासाठी दिलेली 2 हजारांची नोट (Two Thousand Note) न स्वीकारणाऱ्या डॉक्टरची (Doctor) चौकशी करण्यात आली. महापालिका अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष दवाखान्यातून जाऊन याबाबत विचारणा केली.
तसेच, हॉस्पिटलची तपासणी केली. याचा अहवाल बनवून तो संबंधित यंत्रणांना पाठवला जाणार आहे. त्यानंतर कारवाईचे स्वरुप स्पष्ट होईल. संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांनी याबाबतची तक्रार मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने महापालिकेकडे (Kolhapur Municipality) याबाबतची चौकशी करून अहवाल पाठवण्याची सूचना केली.
काल महापालिका आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दवाखान्यात जाऊन झालेल्या प्रकाराची चौकशी केली. तेथील डॉक्टरांचीही चौकशी केली गेली. याचा अहवाल बनवून पुढील कारवाईची दिशा ठरवली जाईल, असे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.
दवाखान्यात बॉम्बे नर्सिंग ॲक्टचे उल्लंघन झाले आहे का याची आम्ही चौकशी केली. तसेच अन्न व औषध प्रशासानाच्या अधिकाऱ्यांनी नियम आणि कायद्यांप्रमाणे रुग्णालयाचे कामकाज चालते का ते पाहिले. याबाबतचा विस्तृत अहवाल बनवला जाणार आहे.
- रविकांत अडसूळ, उपायुक्त, कोल्हापूर महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.