Martyrs Memorial : हुतात्मा स्मारकांच्या देखभालीची थट्टा

वर्षाला अवघ्या चौदाशे रुपयांचा खर्च मंजूर
Islampur Martyrs Memorial
Islampur Martyrs Memorial
Updated on

इस्लामपूर : संपूर्ण देशभरात आझादीचा महोत्सव साजरा होत असताना भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकाची मात्र सरकार पातळीवर थट्टा सुरू आहे. स्मारकांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पूर्ण वर्षांसाठी अवघ्या चौदाशे रुपयांचा खर्च सरकारने मंजूर केला आहे. त्यापेक्षा जादा खर्च न करू नये आणि चौदाशे रुपयांचा हिशेबदेखील सादर करावा, असा आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

दिवंगत नेते बॅरिस्टर अ. र. अंतुले हे मुख्यमंत्री असताना त्यांनी देशासाठी प्राण्याचा त्याग केलेल्या हुतात्म्यांच्या बलिदानाचा सन्मान म्हणून राज्यभरात स्मारके उभारली. नव्या पिढीला या हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे आणि त्यातून या पिढीला धडे मिळावेत, हा त्यामागचा हेतू. राज्यात एकूण २०६ स्मारके आहेत. या स्मारकांसाठी राज्य सरकारने नुकत्याच एका अध्यादेशाद्वारे देखभालदुरुस्तीचा खर्च मंजूर केला असल्याचे जाहीर केले आहे.

अर्थसंकल्पी तरतूद २० लाख ६० हजार रुपयांची आहे. मात्र अर्थ विभागाकडून दोन लाख ८८ हजार ४०० रुपये इतका निधी मंजूर असल्याची सूचना त्यात केली आहे. म्हणजेच २०६ हुतात्मा स्मारकांच्या परिरक्षण व निगा यासाठी प्रतिस्मारक एक हजार ४०० रुपये याप्रमाणे हा निधी वितरित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

दिवाबत्तीसाठी निधी

हुतात्मा स्मारकाची वास्तू तसेच त्यांच्या परिसरातील दिवाबत्ती व बाग-बगीचा यांची व्यवस्था तसेच स्मारकाची देखभाल दुरुस्ती यासाठी ही रक्कम खर्ची करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. याबाबत हुतात्मा स्मारकाच्या संबंधित यंत्रणेत संतापाची भावना व्यक्त होत आहे.

स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकांसाठी सरकारने चौदाशे रुपये मंजूर करून केवळ अवहेलनाच नाही तर घोर अपमान केला आहे. सरकारने ही स्मारके पाडून टाकावीत यासाठी मान्यता द्यावी. हा खर्चदेखील आम्ही स्वतःहून करू. किमान २०-२५ लाख रुपयांची तरतूद सरकार करू शकत नाही का?

- नितीन बानवडे, स्वातंत्र्यसैनिक कै. रंगराव बारवडे यांचे नातू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.