Loksabha Election : 'जय शिवराय' संघटना लढवणार लोकसभा निवडणूक; अध्यक्ष शिवाजीराव मानेंची घोषणा

गेली अनेक वर्षे आम्ही किंगमेकरची भूमिका बजावली आहे.
Jai Shivrai Kisan Sanghatana Loksabha Election
Jai Shivrai Kisan Sanghatana Loksabha Electionesakal
Updated on
Summary

'शेतकऱ्यांनी चांगला लोकप्रतिनिधी निवडल्यास चांगला दर मिळेल.'

पेठवडगाव : जिल्ह्यातील दोन्ही खासदार शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. उसाला पाच हजार शंभर रुपये भाव मिळावा, यासाठी आमची संघटना संघर्ष करीत आहे. तो संघर्ष पुढे सुरू रहाणार आहे. गेली अनेक वर्षे किंगमेकरची भूमिका बजावली. परंतु, यापुढे पॉलिसी मेकर बनण्यासाठी येणारी लोकसभा लढवणार आहे, अशी घोषणा जय शिवराय किसान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव माने (Shivajirao Mane) यांनी केली.

Jai Shivrai Kisan Sanghatana Loksabha Election
Mizoram Election : मिझोरामच्या निवडणुकीत 'हा' मुद्दा ठरणार कळीचा; चुरशीच्या लढतीत कोण मारणार बाजी?

पेठवडगाव (Pethvadgaon) येथे संघटनेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक होते. या कार्यक्रमासाठी गुजरात येथील गणदेवी सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणजित भाई पटेल, भीमराव साठे, नितीन पाटील, बाळासाहेब रास्ते, एन.पी पाटील, राजेंद्र सुतार, अनिल पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी शिवाजीराव माने यांच्या ‘तिढा’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

Jai Shivrai Kisan Sanghatana Loksabha Election
Dhangar Reservation : धनगर समाजाला आरक्षण मिळणार? 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी; पडळकरांनी दिली महत्त्वाची अपडेट

माने म्हणाले, ‘महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन देशाचे सहकार मंत्री व पंतप्रधान यांना पाठवणार आहे. एफआरपी ३ हजार दिली. त्याच्यावरती चारशे रुपये द्या, असे काही नेते म्हणून आत्मक्लेष यात्रा काढत आहेत. मला एक गोष्ट कळत नाही जी चूक आपण केलेली नाही, त्याच्यासाठी आत्मक्लेष का करावासा वाटतो? ३४०० रुपयांनी शेतकऱ्याचे वाटोळ होणार आहे. उसाला पाच हजार शंभर रुपये दर मिळाला तरच महागाईच्या काळात शेतकऱ्याचे जगणे सुसह्य होणार आहे.’

रणजितभाई पटेल म्हणाले, ‘आमच्या राज्यामध्ये जवळच्या एका साखर कारखान्याने विस्तारीकरण केले म्हणून आम्ही लगेच विस्तारीकरण केले असे होत नाही. एखादा छोटा साखर कारखाना असेल तर तो कारखाना मोठ्या कारखान्यामध्ये विलीन करून क्षमता वाढवावी हा आमचा हेतू असतो. गतहंगामात मार्चअखेर आम्ही उसाला ३,६७५ रुपये दर दिला. यासाठी आमचा साखर उतारा साडेअकरा टक्के होता. साखर कारखान्याचे नियोजन हे अत्यंत नेटकेपणाने झाले तर आपण शेतकऱ्यांना उत्तम दर देऊ शकतो.’

Jai Shivrai Kisan Sanghatana Loksabha Election
Airline Service : बड्या लोकांसाठी आनंदाची बातमी! आता कोल्हापूर-मुंबई विमानात असणार 'बिझनेस क्लास'; कधीपासून सेवा सुरु?

वसंतराव मुळीक म्हणाले,‘शेतकऱ्यांनी चांगला लोकप्रतिनिधी निवडल्यास चांगला दर मिळेल. विकासामध्ये शेतकऱ्यांचे योगदान मोठे आहे. ’ यावेळी शामल सुतार, श्रावणी पाटील या विद्यार्थिनींची भाषणे झाली. सदाशिव कुलकर्णी यांनी स्वागत केले. शामसुंदर जायगुडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.