जयसिंगपूर (कोल्हापूर) : सामाजिक कार्यकर्ते सागर आडगाणे आणि पालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती मुसा डांगे यांची अपेक्षेप्रमाणे शनिवारी (ता.२८) स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांच्या अध्यक्षतेखालील ऑनलाईन सभेत या निवडी पार पडल्या.
जेष्ठ नगरसेवक संभाजी मोरे आणि गुंडप्पा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त पदांसाठी निवड प्रक्रिया झाली. २०१० मध्ये डांगे यांनी नगरपालिका शिक्षण मंडळाचे सभापती म्हणून काम पाहिले आहे. काँग्रेसचे नेते, दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे.
सागर आडगाणे यांना गेल्या दोन-तीन वेळा स्विकृत नगरसेवकपदाने हुलकावणी दिली.
बंधू युनूस डांगे विद्यमान नगरसेवक आहेत. ते दुसऱ्यांदा नेतृत्व करत आहेत. तर मुसा डांगे याना स्विकृतपदी संधी मिळाल्याने एकाच घरातील दोन सख्खे भाऊ एकाच एकाच वेळी नगरसेवक होण्याचा मानही डांगे कुटुंबाला मिळाला आहे. डांगे यांची निवड निश्चित मानली जात होती. शनिवारच्या निवडीनंतर त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
सागर आडगाणे यांना गेल्या दोन-तीन वेळा स्विकृत नगरसेवकपदाने हुलकावणी दिली. केवळ नेत्यांचा 'शब्द' मानून त्यांनी तटस्थाची भूमिका घेतली होती. मात्र, नेत्यांनी शब्द पाळल्याने शनिवारी आडगाणे यांना विजयाचा गुलाल लागला. त्यांच्या मातोश्री श्रीमती सरोजिनी आडगाणे या २००५ साली नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी महिला बालकल्याण, नियोजन, आरोग्य अशा विभागांच्या सभापतीपदाची धुरा सांभाळली होती.
आडगाणे यांनी रोटरीच्या माध्यमातून विविध कामे केली आहेत. स्मशानभूमी नूतनीकरण, राजीव नगरमध्ये बालवाडी, छत्रपती शिवाजी हॉलसाठी केलेले कार्य संसमरणीय ठरले आहे. निवडीनंतर डांगे व आडगाणे यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. फटाके, हलगीचा निनाद आणि गुलालाची उधळण करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.