'आम्ही सतेज पाटलांचं नेतृत्व मानलंय, धर्मांध शक्तीसोबत कधीच जाणार नाही'; कोरींनी मुश्रीफांवर साधला निशाणा

Janata Dal leader Swati Kori : जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी विचार, मूल्ये, तत्वांशी कधीही प्रतारणा केलेली नाही.
Janata Dal leader Swati Kori
Janata Dal leader Swati Kori esakal
Updated on
Summary

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर विश्वास ठेवून सभासदांनी मतदान केले; पण मुश्रीफ गोडसाखर बंद पाडण्याचे षड्‍यंत्र करीत आहेत.

गडहिंग्लज : आम्ही सतेज पाटील (Satej Patil) यांचे नेतृत्व मानले आहे. लोकसभेत त्यांनी सांगितलेल्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे आता आमच्यावर अन्याय होणार नाही हे पाहण्याची जबाबदारी त्यांची आहे. आम्ही लढाऊ आहोत. जिथे म्हणाल तिथून लढू. कागलच नाही, तर कोल्हापूर उत्तरमधूनही लढू, असा निर्धार व्यक्त करतानाच धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, धर्मांध शक्तीसोबत कधी जाणार नाही हे खरे असले तरी आम्हाला कदापि गृहीत धरू नका, असा इशारा जनता दलाच्या नेत्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी (Swati Kori) यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.