मागील वेळी निसटता पराभव झालेल्या 'या' नेत्याला 'जनसुराज्य'कडून पुन्हा उमेदवारी; आमदार कोरेंची घोषणा

MLA Vinay Kore : ‘गेल्या विधानसभेला #ElectionWithSakal हातकणंगलेतून नवखे असतानाही अशोकराव माने यांचा निसटता पराभव झाला.
MLA Vinay Kore
MLA Vinay Koreesakal
Updated on
Summary

आमदार कोरे म्हणाले, ‘गतवेळी मानेंना (Ashokrao Mane) ऐनवेळी उमेदवारी दिली. काही अडचणीमुळे अनेकांनी सहकार्य केले नाही.'

वारणानगर : ‘गेल्या विधानसभेला हातकणंगलेतून नवखे असतानाही अशोकराव माने यांचा निसटता पराभव झाला. मात्र, त्यांनी पाच वर्षांत मतदारसंघात संपर्कासह विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यामुळे यंदा जनसुराज्य शक्तीचे उमेदवार अशोकराव मानेच आहेत,’ असे प्रतिपादन जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (Vinay Kore) यांनी येथे केले. येथे हातकणंगले तालुक्यातील (Hatkanangale) कार्यकर्त्यांच्या मेळाव्‍यात ते बोलत होते.

MLA Vinay Kore
अजितदादांना मोठा धक्का! रामराजेंच्या सैन्याने फुंकली तुतारी; संजीवराजे, आमदार चव्हाण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

आमदार कोरे म्हणाले, ‘गतवेळी अशोकराव मानेंना (Ashokrao Mane) ऐनवेळी उमेदवारी दिली. काही अडचणीमुळे अनेकांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे निसटता पराभव झाला. पाच वर्षांत अशोकराव माने यांनी ठेवलेला संपर्क आणि वारणा समूहातील पदाधिकाऱ्यांनी काम करण्याचा घेतलेला निर्णय यामुळे अशोकराव माने आमदार होणार हे निश्‍चित. वारणा परिसरातील गावात एक लाख ३० हजार मते असून ९० हजार मतदान होईल. वारणेचा परीसस्पर्श नसलेले घर दाखवा. त्यामुळे ६० हजार मते माने यांना मिळतील. ४० हजारांचे मताधिक्य मिळेल. निवडणुकीत आवाडे गट, महाडिक गट, यड्रावकर, माने गट जनसुराज्यशक्ती पक्षाला साथ देणार आहेत.’ #ElectionWithSakal

MLA Vinay Kore
Hasan Mushrif : 'राजेंनी ईडी लावली म्हणून मला भूमिका बदलावी लागली, नाहीतर..'; मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर निशाणा

अशोकराव माने म्हणाले, ‘विद्यमान आमदारांनी अन्य आमदारांच्या तुलनेत मतदारसंघाचा विकास केला नाही. त्यामुळे हातकणंगले विधानसभा मतदारसंघ अद्यापही मागासलेलाच आहे.’ अंबप सह्याद्री शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र माने यांनी स्वागत केले. पांडुरंग सिद यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी केडीसीसी बॅंकेचे संचालक विजयसिंह माने, वडगावचे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, वारणेचे संचालक प्रदीप देशमुख, सुभाष पाटील, शहाजी पाटील, उदयसिंह पाटील, किशोर पाटील यांच्यासह वारणा समूहातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा. नामदेव चोपडे यांनी सूत्रसंचालन, वारणा बॅंकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.