एक लाख भाविकांमुळे जोतिबा डोंगर हाऊसफुल्ल; यंत्रणा कोलमडली

मंदिराबाहेर सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता
kolhapur
kolhapur sakal
Updated on

जोतिबा डोंगर : श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर (ता. पन्हाळा ) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या दर्शनसाठी आज राज्यभरातून सुमारे एक लाख भाविकांनी हजेरी लावली. त्यामुळे डोंगरावराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. रविवार असल्याने पहाटेपासून डोंगरावर भाविक येण्यास सुरुवात झाली. तब्बल आठ महिन्यांनी डोंगरावर पहिल्यांदा इतकी मोठी गर्दी दिसून आली.

पहाटेपासूनच मुख्य मंदिरात दर्शन सुरु झाले. दक्षिण दरवाजातून भाविकांना सोडण्यात तर उत्तर दरवाजातून बाहेर येण्याचा मार्ग होता. काहींनी रांगेतून तर काहींनी कळस दर्शन घेतले. मुख्य मंदिरात जाताना मास्क आणि सॅनिटायझर लावणे बंधनकारक होते. मात्र मंदिराबाहेर सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. मंदिरात आज सकाळी पाद्य पूजा, काकड आरती, मुख मार्जन या विधीनंतर मंगलपाठ झाले. अभिषेकावेळी केदार स्त्रोत, केदार कवच यांचे पठण झाले. त्यानंतर चौथ्या दिवशी जोतिबाची पाच पाकळी सोहन कमळ पुष्पातील महापूजा बांधण्यात आली. पूजा गावातील प्रमुख दहा गावकऱ्यांनी बांधली.

मानाचे उंट, घोडा यांच्या उपस्थितीत धुपारती सोहळा पार पडला. यमाई मंदिराकडे सवाद्य मिरवणुकीन गेल्यानंतर.विविध तेथे धार्मिक विधी झाले. यावेळी देवस्थान समितीचे अधिक्षक महादेव दिंडे, ग्रामस्थ पुजारी भाविक उपस्थित होते. त्यानंतर गजगतीने हा सोहळा मुख्य मंदिरात आला. यावेळी प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली आणि धुपारती सोहळ्याची सांगता झाली. डोंगरावर आज शाहुवाडी विभागाचे पोलिस उपअधीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशीद यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले. दरम्यान अचानक वाढलेल्या गर्दीमुळे बंदोबस्त कमी असल्यामुळे यंत्रणेवर मोठा ताण पडला.

ऑनलाईन बुकिंगची यंत्रणा कोलमडली

जोतिबावरील ई-पास दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंगची यंत्रणा कोलमडली आहे. काल दुपारी १२ ते ३ वेळी या यंत्रणेत बिघाड झाला होता. तसेच आजही दिवसभर नेटवर्क कमी जास्त होत होते. दिवसभरात लाखाभर भाविकांनी ईपास बुकिंग केले. त्यामुळे अनेक भाविकांना मुखदर्शन व कळस दर्शनावर समाधान मानावे लागले. भर उन्हात भाविक रांगेत उभे होते. लहान मुले वयोवृध्द यांचे हाल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.