संजय मंडलिकांचा कोणाला पाठिंबा? मुश्रीफ की समरजित घाटगे? माजी खासदारांनी स्पष्टच सांगितलं...

Kagal Constituency : २०१९ व २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी मला पाठबळ दिले.
Kagal Constituency Sanjay Mandlik
Kagal Constituency Sanjay Mandlikesakal
Updated on
Summary

माजी आमदार संजय घाटगे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा देण्याची भूमिका कालच जाहीर केली आहे.

मुरगूड : २०१९ व २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी मला पाठबळ दिले. घाटगे यांच्या विरोधात जाण्यासारखे सध्‍यातरी काही घडलेले नाही. अगोदर महायुतीत काय ठरतंय बघतो आणि मग काय करायचं ते ठरवू. समन्वयकाची जबाबदारी म्हणून महायुतीचा (Mahayuti) उमेदवार निवडून यावा हीच माझी आजची भूमिका आहे, असे स्पष्ट मत प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी मांडले.

Kagal Constituency Sanjay Mandlik
Vishalgad Riots : 'पोलिसांसमोरच विशाळगड-गजापूरमध्ये दंगल, संविधानाचे धिंडवडे निघाले'; अबू आझमींनी व्यक्त केला संताप

येथील सानिका स्पोर्टस् फाउंडेशनतर्फे आयोजित शालेय साहित्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील अध्यक्षस्थानी होते. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, बाबासाहेब पाटील, दत्तामामा खराडे, नामदेवराव मेंडके, किरण गवाणकर, शिवाजी चौगुले, सुहास खराडे, अनंत फर्नांडिस आदी प्रमुख उपस्थित होते.

Kagal Constituency Sanjay Mandlik
Dhananjay Mahadik : लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंना 'भारतरत्न' द्या; खासदार महाडिकांची मोदी सरकारकडे मागणी

घाटगे म्हणाले, ‘सत्ता नसताना आठ वर्षांत कोट्यवधींची विकासकामे खेचून आणली. आता आमदारकीची संधी द्या. पाच वर्षांत विकास कसा असतो ते दाखवून देतो.’स्वागत राजू चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक दगडू शेणवी यांनी केले. सूत्रसंचालन एम. बी. टिपुगडे यांनी केले. आभार निशांत जाधव यांनी मानले.

कागल मतदारसंघ बिनविरोध होतोय की काय?

माजी आमदार संजय घाटगे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा देण्याची भूमिका कालच जाहीर केली आहे. याचा संदर्भ घेताना मंडलिक यांनी काहींनी उमेदवारीची घोषणा केली. पण, ते आता निवडणुकीला उभारणार नाही म्हणतात. त्यामुळे संभाव्य उमेदवारांच्या बदलत्या भूमिका लक्षात घेता तर कागल मतदारसंघ बिनविरोध होतोय की काय, असे वाटत असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.