कागलमध्ये पुन्हा स्वराज्य निर्माण करायचं आहे. यासाठी जे काही निर्णय घ्यावे लागले, तर घेतले जातील. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून आलोय, त्यांना सांगून आलोय.
कागल : सध्या कागलमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूमिकेविषयी उलटसुलट चर्चेत असलेले भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) राष्ट्रवादी काँग्रेसची (शरदचंद्र पवार) 'तुतारी' हाती घेण्याच्या तयारी आहेत. त्यामुळे ते नेमकी कोणती भूमिका घेतात आणि राजकीय दिशा ठरवतात याकडं कागल तालुक्यासह राज्याचं लक्ष लागलंय.