चूक नसताना तुरुंगात डांबायचं, कुटुंबीयांना त्रास द्यायचा ही वाईट प्रवृत्ती नाही का? 'त्या' वक्तव्याबाबत मुश्रीफ स्पष्टच बोलले

Hasan Mushrif vs Samarjit Ghatge : तुरुंगात डांबयचे, कुटुंबीयांना धमकवायचे आणि राजकारण करायचे ही प्रवृत्ती वाईट आहे.
Hasan Mushrif vs Samarjit Ghatge
Hasan Mushrif vs Samarjit Ghatgeesakal
Updated on
Summary

''जागा वाटपाचा निर्णय पक्षेचे नेते करतील. आपल्या जिल्ह्यातील चित्र स्पष्ट आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर शिवसेना, भाजप दोघांनी दावा सांगितला आहे.''

कोल्हापूर : तुरुंगात डांबयचे, कुटुंबीयांना धमकवायचे आणि राजकारण करायचे ही प्रवृत्ती वाईट आहे. मी या प्रवृत्तीच्या विरोधात बोललो. मी कोणत्याही व्यक्तीवर बोललेलो नाही. मी व्यक्तीवर टीका करत नाही, असे स्पष्टीकरण पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Hasan Mushrif vs Samarjit Ghatge
Amit Shah : 'शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा'; विधानसभेआधी अमित शहांचं कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे येथे समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांच्या समर्थकांचा मेळावा झाला. त्याला सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा पडला. त्यावेळी यांच्या घरातील महिला पुढे गेल्या हे मागे होते, अशी टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना समरजितसिंह घाटगे यांच्याबाबत मुश्रीफांनी चुकीचे शब्द वापरले होते.

त्याबाबत मुश्रीफ म्हणाले, ‘माझ्या घरावर छापा कोणामुळे पडला ते आधी पाहिले पाहिजे. चूक नसताना तुरुंगात डांबायचे, कुटुंबीयांना त्रास द्यायचा आणि राजकारण करायचे ही प्रवृत्ती वाईट नाही का? या विरोधात मी बोललो आहे. व्यक्तीवर टीका केलेली नाही. मुंबईत आमच्या समर्थकांचा मेळावा झाला. आम्ही तीन हजारांची तयारी केली होती. पण, सहा हजारांपेक्षा अधिक लोक आले. मुंबईत राहणारे कागल-गडहिंग्लज मतदारसंघातील लोक जेव्हा गावात येतात त्यावेळी रस्ते, पाणी, वीज, शाळा या सुविधा पाहतात. त्यामुळे त्यांना माझ्‍‍या कामांची माहिती आहे.

Hasan Mushrif vs Samarjit Ghatge
पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली! 'या' पिता-पुत्राचा BJP मध्ये जाहीर प्रवेश; हाळवणकरांची भूमिका ठरणार महत्त्वाची

मुश्रीफ म्हणाले, ‘जागा वाटपाचा निर्णय पक्षेचे नेते करतील. आपल्या जिल्ह्यातील चित्र स्पष्ट आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर शिवसेना, भाजप दोघांनी दावा सांगितला आहे. बाकी सर्व ठिकाणांच्या लढती स्पष्ट आहेत. आता ज्याला तिकीट मिळणार नाही तो अन्य पक्षांत जाणार हे स्पष्ट आहे.’

संजय मंडलिक यांच्याशी चर्चा

मंडलिक गट बरोबर येणार का? या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, ‘मी संजय मंडलिक यांच्याशी बोललो आहे. त्यांच्यातील नाराजांची मनधरणी करू. वीरेंद्र मंडलिकांनाही सोबत घेऊ. काही गैरसमज असतील तर ते दूर करू. मंडलिक गट माझ्यासोबत असेल.’

Hasan Mushrif vs Samarjit Ghatge
भाजप नेते सुरेश हाळवणकर बंडखोरी करणार? आमदार आवाडेंच्या BJP प्रवेशानंतर स्वत:च स्पष्ट केली भूमिका

शिरोळ मतदारसंघावर दावा

मुश्रीफ म्हणाले, ‘शिरोळ मतदारसंघ पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होता. आम्ही तो गेल्या निवडणुकीत शेट्टींना दिला. तेथे राजेंद्र पाटील-यड्रावकर निवडून आले. आता हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, अशी आमची मागणी आहे. आम्ही राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना तिकीट देऊ. जिल्ह्यातील चंदगड, कागल राष्ट्रवादीकडेच आहेत.’

भाजप माझ्याबरोबरच

कागल-गडहिंग्लज मतदारसंघातील भाजपचे नेते, कार्यकर्ते यांची बैठक मंत्री चंद्रकांत पाटील घेणार आहेत. महायुतीचा घटक असल्याने ते मलाच मदत करतील, असेही मुश्रीफांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.