कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात समरजितसिंह घाटगे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाऊन तुतारी हे चिन्ह घेण्याची निश्चित केले.
कागल : शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी आज भाजपाला रामराम ठोकला. त्यांनी भाजप पक्षातून शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले. याबाबतचा निर्णय त्यांनी आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घेतला. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करणार आहेत.