स्वार्थापोटी शरद पवारांना सोडून मुश्रीफांनी मोठा धोका दिला, याची किंमत त्यांना मोजावी लागेल; समरजित घाटगेंचा इशारा

Samarjit Ghatge vs Hasan Mushrif : शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेता तर मग आजपर्यंत किती गंगाराम कांबळे घडवले?
Samarjit Singh Ghatge Sharad Pawar
Samarjit Singh Ghatge Sharad Pawaresakal
Updated on
Summary

अमित शहा यांनाही माहीत आहे की जो माणूस सर्व काही दिलेल्या शरद पवार यांना फसवू शकतो तर तो आमचा तरी कसा होईल?

कागल : ‘कागलमधील लढाई हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) विरुद्ध समरजितसिंह घाटगे अशी नसून धनशक्ती विरुद्ध स्वाभिमानी जनता यांच्यामध्ये आहे. या लढाईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आशीर्वाद व स्वाभिमानी जनता यावेळी माझ्यासोबत आहे. पवार यांच्यावर कागलच्या जनतेचे आजही प्रेम आहे. मात्र, पालकमंत्री मुश्रीफ यांनी स्वार्थापोटी पवार यांच्यावरील निष्ठेचा सौदा केला आहे. यावेळी हा सौदा त्यांना खूप महागात पडणार आहे,’ असा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी लगावला.

Samarjit Singh Ghatge Sharad Pawar
'या' शिल्पकाराने घडवलाय राहुल गांधींनी अनावरण केलेला कोल्हापुरातील शिवरायांचा पुतळा; जाणून घ्या रायगड कनेक्शन

ज्येष्ठ कार्यकर्ते व शाहू ग्रुपमधील (Shahu Group) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. घाटगे म्हणाले, ‘स्वार्थापोटी शरद पवार यांना अडचणीच्या वेळी सोडून मुश्रीफ यांनी मोठा धोका दिलेला आहे. याची किंमत त्यांना मोजावी लागेल. कागल मतदारसंघांमध्ये निवडणुकीआधीच पैशांचा प्रचंड वापर सुरू आहे. जनतेची किंमत पैशांत केली जात आहे. मोठ्या प्रमाणात विकासकामासाठी निधी आणला म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांना इतर गटांची मदत घ्यावी लागते.

शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेता तर मग आजपर्यंत किती गंगाराम कांबळे घडवले? शेंडा पार्कातील उद्‌घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणणार म्हणत होते, पण ते आले नाहीत. कारण, अमित शहा यांनाही माहीत आहे की जो माणूस सर्व काही दिलेल्या शरद पवार यांना फसवू शकतो तर तो आमचा तरी कसा होईल?

Samarjit Singh Ghatge Sharad Pawar
कारमधून उतरत राहुल गांधींनी थेट कौलारू घर गाठलं अन् दलित कुटुंबासोबत घेतला भोजनाचा आस्वाद, स्वत:च बनवल्या भाज्या

यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवानंद माळी, उदयसिंह घाटगे, अरविंद रसाळ व राघू हजारे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर सुहासिनीदेवी घाटगे, नवोदिता घाटगे, अमरसिंह घोरपडे, माजी राज्यमंत्री वीरकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.