Good News - कळंबा तलावाला मिळणार नवा लूक

kalmba
kalmba esakal
Updated on
Summary

महापालिका प्रशासनातर्फे तलावाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पाच कोटींच्या निधीचा नियोजित आराखडा तयार करण्यात येत आहे.

कळंबा : अतिवृष्टीमुळे कळंबा तलावाला (kalmba lake, kolhapur) धोका निर्माण झाला आहे. तलावाच्या पाणी साठवणुकीचा अविभाज्य घटक असणाऱ्या बंधाऱ्याचे मोठ्या प्रमाणात दगड निखळून पडले आहेत. लहान सांडव्याची प्रचंड दुरवस्था झाली. ओढ्यावरील पुलाचा भराव खचला असून, तलावाच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या मनोऱ्याचे छत तुटून गेले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनातर्फे (kolhapur municipal corporation) तलावाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पाच कोटींच्या निधीचा नियोजित आराखडा तयार करण्यात येत आहे. (kolhapur News) परिणामी, कळंबा तलावाला नवा लूक मिळणार आहे.

२०१० व २०२१ या पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे (heavy rain) कळंबा तलावाच्या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. तसेच, दगडी पिचिंग मोठ्या प्रमाणात खचले. दहा कोटींच्या निधीतून संबंधित ठेकेदाराने बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे तीन वेळा काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियोजनशून्य कारभार व अनुभवी मजूर नसल्याने बंधाऱ्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. त्याचबरोबर सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने लहान सांडव्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

kalmba
शेतकऱ्यांसमोर आव्हान तापमान वाढीचे; कृषी क्षेत्राला मोठा फटका

तलावाची पातळी दर्शविणाऱ्या मनोऱ्याच्या छताचे पत्रे तुटून पडले असून, प्रचंड दुरवस्था झाली आहे. तसेच, १९ ते २४ जुलैदरम्यान झालेल्या धुवाधार पावसामुळे तलावासमोरील ओढ्यावरील पुलाचा भराव मोठ्या प्रमाणात खचला आहे. तसेच, त्याचे सिमेंटचे पिलर निघू लागले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनातर्फे तलावाच्या जतन व संवर्धनासाठी पाच कोटींचा नियोजित आराखडा तयार केला जात आहे.

देशातील सहा पेयजल योजनेत नैसर्गिक पाणीपुरवठा करणारा म्हणून या तलावाचा लौकिक आहे. संस्थानकाळात तलावाच्या बांधणीचे काम पूर्ण झाले. १९७२ मधील दुष्काळजन्य परिस्थिती व २०१६ मध्ये अनियमित पाऊस झाल्याने तलावाचे पात्र मोठ्या प्रमाणात कोरडे पडले होते. ही दोन वर्षे सोडली तर १३६ वर्षे कळंबा तलाव ओसंडून वाहिला आहे. मात्र, अतिवृष्टी आणि पाणीसाठ्याचा दाब वाढल्याने कळंबा तलावाची दुरवस्था झाली. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून तलावाच्या सुशोभीकरणासाठी दहा कोटींचा निधी मंजूर केला होता. त्या निधीतून तलावाची अनेक विकासकामे संबंधित ठेकेदाराने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, विकासकामासाठी अपुरा निधी पडल्याने गेली तीन वर्षे सुशोभीकरणाचे काम रखडले आहे.

kalmba
भारतातील 'ही ' आहेत प्रसिद्ध Butterfly Parks ; जाणून घ्या ठिकाणे

पक्षीनिरीक्षण टॉवर व सायकल ट्रॅक

पाच कोटींच्या निधीतून कळंबा तलावाच्या दुरुस्ती व सुशोभीकरणाबरोबर पक्षीनिरीक्षण टॉवर उभारण्यात येणार आहे. तसेच, सायकल ट्रॅक बांधण्यात येईल.

"कळंबा तलावाच्या जतन आणि संवर्धनासाठी पाच कोटींचा नियोजित आराखडा तयार करण्यात येणार आहे."
- रविकांत आडसूळ, उपायुक्त मनपा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.