सर्वपक्षीय नेते-मंडळी या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे ‘राष्ट्रवादी’चे अनिल घाटगे यांनी सांगितले.
कोल्हापूर : ‘काळम्मावाडीतून (Kalammawadi Dam) थेट पाईपलाईनद्वारे कोल्हापूर शहराला शाश्वत पाणी पुरवठा करण्याचे ५० वर्षांचे शहरवासीयांचे स्वप्न आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी साकारले आहे.
त्याबद्दल थेटपाईपलाईन (Pipeline Scheme) वचनपूर्ती लोकसोहळ्याअंतर्गत सर्वपक्षीयांतर्फे आमदार पाटील यांचा सत्कार मंगळवारी (ता. २१) सायंकाळी पाच वाजता दसरा चौकात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती सर्वपक्षीय गौरव समितीचे निमंत्रक व कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘थेट पाईपलाईन आणली नाही, तर आमदारकीची निवडणूक लढविणार नाही, असे वचन आमदार सतेज पाटील यांनी शहरवासीयांना दिले होते. या वचनाची पूर्तता करत त्यांनी शहराला दिवाळीत थेट पाईपलाईनच्या पाण्याची भेट दिली. त्याबद्दल सर्वपक्षीयांनी त्यांचा मंगळवारी नागरी सत्कार आयोजित केला असल्याचे चव्हाण आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी सांगितले.
५० वर्षांपूर्वी थेटपाईपलाईनसाठीचा लढा सुरू झाला. मात्र, ही पाईपलाईन मंजूर झाल्यानंतर त्याद्वारे शहराला प्रत्यक्ष पाणी देण्याचे काम आमदार पाटील यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यासह थेटपाईपलाईनसाठी लढा, योगदान देणाऱ्या माजी महापौर, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध ५० जणांचा सत्कार या लोकसोहळ्यात केला जाणार असल्याचे ‘भाकप’चे दिलीप पवार आणि सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, भाकप आदी सर्वपक्षीय गौरव समितीने या लोकसोहळ्याचे आयोजन केले आहे.
सर्वपक्षीय नेते-मंडळी या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे ‘राष्ट्रवादी’चे अनिल घाटगे यांनी सांगितले. यावेळी मोहन सालपे, एस. बी. पाटील, प्रदीप चव्हाण, अरुण कदम, संध्या घोटणे, भारती पोवार, वैशाली महाडिक, लीला धुमाळ, संजय पोवार-वाईकर, संभाजीराव जगदाळे, किशोर खानविलकर आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.