कोल्हापूर - बावडा स्मशानभुमीला पुराचा वेढा; अंत्यसंस्कार बंद

परिसरात दाणादाण, अनेक घरांत पाणी, लोकांचे स्थलांतर
कोल्हापूर - बावडा स्मशानभुमीला पुराचा वेढा; अंत्यसंस्कार बंद
Updated on

कसबा बावडा : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेला महापूर आला असून नदीच्या पाण्याने या परिसरातील स्मशानभुमीलाच वेढा दिल्याने अंत्यसंस्कार बंद करण्याची वेळ आज आली. इतर कारणांनी मृत्यु झालेल्यांवर या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येत होते, पण स्मशानभुमीच्या प्रवेशद्वारावरच सुमारे चार फूट पाणी आल्याने आत जाण्याचा मार्गच बंद झाला आहे.

दरम्यान, कसबा बावडा आणि परिसरात पाऊस आणि महापुराने दाणादाण उडवून दिली आहे. नदीकाठाला लागून असलेल्या खामकर मळा, बिरंजे पाणंद, बडवडे मळा, खुळे पाटील मळा, माळी मळा, उलपे मळा, वाडकर मळा याठिकाणी नदीचे पाणी पोहचले आहे. काही घरांतही पाणी घुसल्याने लोकांनी स्थलांतर करण्यास सुरूवात केली आहे. तर मळ्यात असलेली जनावरेही मालकांनी सुरक्षित ठिकाणी हलवली आहेत. पहाटेपासून या परिसरात स्थलांतर आणि साहित्यांसह जनावरे हलवण्याची लगबग सुरू होती.

कोल्हापूर - बावडा स्मशानभुमीला पुराचा वेढा; अंत्यसंस्कार बंद
Video - बस गेली वाहून; नाशिकचे 11 प्रवासी सुखरूप, भुदरगडची घटना

कोरोनामुळे मयत झालेल्या रूग्णांवर अँत्यसंस्कारासाठी शहरातील पंचगंगा स्मशानभुमी राखीव ठेवली आहे. त्यामुळे अन्य कारणांनी मयत झालेल्या नागरीकांवर कसबा बावडा स्मशानभुमीत अंत्यसंस्कार केले जात होते. शहरवासियांसाठी हा मोठा दिलासा होता. पण गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राजाराम बंधाऱ्याजवळील पंचगंगेचे पाणी या स्‍मशानभुमीपर्यंत पोहचले आहे. प्रत्यक्ष अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पाणी नसले तरी स्मशानभुमीत जाणारा एकमेव रस्ता पाण्याखाली गेला आहे. स्मशानभुमीत प्रवेशच करता येत नसल्याने आज याठिकाणचे अंत्यसंस्कार थांबवण्यात आले. कमदवाडी व बापट कॅम्प स्मशानभुमीत अंत्यसकाराला जाण्याची वेळ नागरीकांवर आली.

रेणुका मंदीरसमोरील कॉलनीबरोबरच या परिसराला लागून असलेल्या शंभर फुटी रस्त्यावरही पंचगंगेचे कंबरेएवढे पाणी आले आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांना हलवण्याचे काम सुरू झाले आहे. गृहयोग प्रकल्पात जाणारा मार्गही बंद झाल्याने या ठिकाणी रहाणाऱ्या लोकांनी आपली वाहने रस्त्यावरच लावली आहेत. रमणमळा परिसरातही अनेक घरात पाणी घुसल्याने या परिसरातील नागरीकांना महसूल कल्याण निधीच्या सभागृहात हलवण्यात आले. याच परिसरातील मोठ्या गृहप्रकल्पालाही पाण्याचा वेढा पडल्याने लोकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी हलवली आहेत.

बावडा-शिये रस्ता बंद

कसबा बावड्यातून शियेसह औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर जुन्या टोल नाक्याच्या पुढे कंबरेएवढे पाणी आले आहे, त्यामुळे हा मार्गही वाहतुकीसाठी बंद झाला.

कोल्हापूर - बावडा स्मशानभुमीला पुराचा वेढा; अंत्यसंस्कार बंद
Kolhapur Flood Update - कोल्हापूरला पुन्हा महापुराचा विळखा

रेणुका मंदीरासमोरील रस्‍त्यावर पाणी

न्यायालयाच्या समोरून कसबा बावड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेणुका मंदीर येथेही गुडघाभर पाणी आले आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. हे पाणी रस्‍त्याला लागून असलेल्या त्र्यंबोली कॉलनीसह इतर कॉलनीतील काही घरांत घुसले आहे. त्यामुळे लोकांची एकच तारांबळ उडाली आहे. या नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.

शाहू जन्मस्थळही पाण्यात

कागलवाडी परिसरात असलेल्या शाहू जन्मस्थळातही पंचगंगेच्या पुराचे पाणी घुसले आहे. प्रत्यक्ष इमारतीत पाणी घुसले नसले तरी चोहोबाजुंनी पाण्याचा वेढा पडल्याने या परिसरात जाणारे मार्गही बंद झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.