कासारी धरणात गतवर्षीपेक्षा 11 टक्के पाणीसाठा जादा 

Kasari Dam has 11 per cent more water storage
Kasari Dam has 11 per cent more water storage
Updated on

माजगाव : पश्‍चिम पन्हाळा तालुक्‍याला व शाहूवाडी तालुक्‍यातील काही गावांना सुजलाम्‌ सुफलाम्‌ करणारे कासारी (गेळवडे) धरण 6 जुलैअखेर 45 टक्के भरले आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 34 टक्के धरण भरलं होत. यंदा या धरणात गतवर्षी पेक्षा 11 टक्के पाणीसाठा जास्त आहे. तसेच धरण पाणलोट क्षेत्रात 1 जूनपासून आजअखेर 1113 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी सध्या धरणातून सुमारे 250 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. 

कासारी पाणलोट क्षेत्रात गेळवडे या प्रमुख मध्यम प्रकल्पासह कुंभवडे, केसरकरवाडी,पोबरे, पडसाळी, व नादांरी हे लघु पाटबंधारे प्रकल्प येतात. गेळवडे हे प्रमुख धरण असून याची पाणी साठवण क्षमता 2.77 टीएमसी आहे. या प्रकल्पाखाली शाहूवाडी तालुक्‍यातील 20 गाव व पन्हाळा तालुक्‍यातील 41 गावांना उपसा सिंचन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्या मधून पाणी मिळते.

उन्हाळ्यात पाणी अडवण्यासाठी नदीवर जागोजागी सुमारे 14 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. सुमारे 9 हजार 458 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. कासारी (गेळवडे) 6 जुलै अखेर 1.25 टीएमसी भरले आहे. हे धरण सध्या 45 टक्के भरले असून गतवर्षी तुलनेत पाणीसाठा 11 टक्के अधिक आहे 

यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने पावसाळ्यापूर्वीचं धरणात सुमारे 30 टक्के पाणी शिल्लक होते. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे कासारी धरण लवकरच भरते. पण संभाव्य पूरपरिस्थिती गंभीर होऊ नये म्हणून सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. 
- संभाजी काटे, इमारत शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग कोल्हापूर 


दृष्टिक्षेप
-  धरण 6 जुलैअखेर 45 टक्के भरले 
- 1 जूनपासून आजअखेर 1113 मिलिमीटर पावसाची नोंद 
- धरणातून सुमारे 250 क्‍युसेक पाणी विसर्ग 
- सुमारे 9 हजार 458 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.