यावेळच्या निवडणुकीपुर्वीच प्रकाश आवाडे यांनी भाजपसोबत जाणे पसंत केले.
कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाने उमेदवारी नाकारल्याने एकाकी पडलेले विद्यमान संचालक विलास गाताडे यांनी अखेर आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून ते संचालक होते, याच गटातून त्यांनी अर्ज दाखल केला होता.
बँकेच्या पाच वर्षापुर्वी झालेल्या निवडणुकीत विलास गाताडे हे आमदार प्रकाश आवाडे यांचे समर्थक म्हणून बँकेत आले. त्यावेळी प्रकाश आवाडे हेच काँग्रेसमध्ये होते. यावेळच्या निवडणुकीपुर्वीच प्रकाश आवाडे यांनी भाजपसोबत जाणे पसंत केले. त्यामुळे जिल्हा बँकेत विलास गाताडे यांचा ‘गॉडफादर’ कोण नाही. त्यातच प्रकाश आवाडे यांनी स्वतःच पतसंस्था गटातून उमेदवारी मागितली व सत्तरूढ गटाच्या नेत्यांनी त्यांची उमेदवारीही जाहीर केली, त्यामुळे त्यांच्याकडून गाताडे यांच्यासाठी प्रयत्न होणे शक्य नव्हते.
अशा विचित्र कात्रीत सापडलेल्या गाताडे यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी बँकेचे अध्यक्ष व सत्तारूढ गटाचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक यांची भेट घेऊन प्रयत्न केले. इचलकरंजीतील काँग्रेसक कार्यकर्त्यांसह त्यांनी पालकमंत्री पाटील यांच्यासमोर शक्तीप्रदर्शन केले पण त्याचाही काही उपयोग झाला नाही.
काल (ता. २०) सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी श्री. गाताडे यांच्या गटातून अंबपचे विजयसिंह माने यांची उमेदवारी जाहीर केल्याने श्री. गाताडे यांचा पत्ता कट झाल्याचे जवळपास स्पष्टच होते. कोणाकडूनच दाद न मिळाल्याने एकाकी पडलेल्या श्री. गाताडे यांनी आज अर्ज मागे घेऊन शांत रहाणे पसंत केले.
रिंगणाबाहेरचे दुसरे संचालक
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रिंगणाबाहेर राहीलेले श्री. गाताडे दुसरे संचालक आहेत. यापुर्वीच गगनबावडा विकास संस्था गटाचे प्रतिनिधीत्त्व करणारे बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक पी. जी. शिंदे यांनी अर्जच भरला नव्हता. ते पत्नीच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते, पण तिथेही त्यांचा टिकाव लागला नाही. गाताडे यांना अर्ज मागे घेण्याची वेळ आली तर श्री. शिंदे यांनी अर्जच भरला नव्हता. आतापर्यंत बँकेच्या रिंगणातून बाहेर राहीलेले गाताडे दुसरे संचालक ठरले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.