‘रागातून कृत्य केले आहे’ असे संशयित बिहारी याने गुन्हा कबूल केल्यावर पोलिसांना सांगितले.
कोल्हापूर : जुन्या वादातून अडीच वर्षांच्या बालिकेचे भवानी मंडपातून अपहरण करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संबंधित बालिकेच्या वडिलांच्या परिचित राजू विश्वजित मंडल ऊर्फ राजू बिहारी (वय २०, फिरस्ता, रा. मूळ बिबीघाट नथपाडा, ता. समुत्रा, जि. वर्धमान, बिहार) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
कार्तिकी गणेश गटे (अडीच, मूळ लोणी, ता. राहता. जि. नगर, सध्या बालिंगा, पाडळी वीटभट्टी) असे मृत बालिकेचे नाव आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात (Rajwada Police Station) याची नोंद आहे. वीटभट्टीवर केलेल्या कामाचा मोबदला मुलीच्या वडिलांमुळे मिळाला नाही, याचा राग मनात धरून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः गणेश गटे व त्यांची पत्नी पूजा हे कार्तिकी आणि एक वर्षाच्या मुलासह वीटभट्टीच्या कामासाठी बालिंगा पाडळी (ता. करवीर) येथे आले आहेत. वीटभट्टीचे काम संपत आल्याने काल (ता. १८) दुपारी बाराच्या सुमारास भवानी मंडपात आले होते. मंडपात त्यांची मुलगी कार्तिकी खेळत असताना हरवली. त्यामुळे त्याची फिर्याद देण्यासाठी गणेश जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गेले.
तेथील अधिकारी-अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर कार्तिकीला गणेश गटे यांच्या ओळखीचा राजू बिहारी घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे बिहारीविरोधात संशयित म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताच्या शोधासाठी पोलिस ठाण्यातील डी. बी. शाखेचे उपनिरीक्षक संदीप जाधव अंमलदार व उपनिरीक्षक प्रीतमकुमार पुजारी, अभिजित इंगळे व पोलिस पथकाने यांची तपास पथके तयार केली.
संशयित आणि अपह्रत मुलगी यांचा मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक, मोकळी मैदाने, रंकाळा तलाव, शहर परिसरातील बगीचे, सुनसान ठिकाणी शोध घेतला. त्यात संशयित बिहारी रात्री सापडला. त्याच्याकडे अपहरण केलेल्या मुलीबाबत तपास केला, तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचा राहण्याचा ठावठिकाणा नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे तो फिरस्ता असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी उलट चौकशी सुरू केली असता गणेश व पूजा गटे यांच्याशी बिहारीचा दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता.
त्यातून कार्तिकीला भवानी मंडप येथून तिचा खून करण्यासाठी पळवून घेऊन गेल्याची कबुली दिली. ‘रागातून कृत्य केले आहे’ असे संशयित बिहारी याने गुन्हा कबूल केल्यावर पोलिसांना सांगितले. बालिकेचा खून केल्याचा पश्चाताप होत असल्याचेही त्याने पोलिसांना चौकशीत सांगितले. त्याला अटक करण्यासाठी पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र, मध्यरात्री कार्तिकीचा मृत्यू झाल्याचे समजताच सर्वांनी हळहळ व्यक्त केली. संशयिताला मध्यरात्री अटक केल्यावर त्याने खुनाचा उलगडा झाला.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपअधीक्षक मंगेश चव्हाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल ढवळे, पोलिस हवालदार परशुराम गुजरे, सतीश भांबरे, प्रशांत घोलप, सागर डोंगरे, प्रीतम मिठारी, गजानन गुरव, प्रशांत पांडव, हणमंत कुंभार, पोलिस नाईक अमर पाटील, संदीप माने, कॉन्स्टेबल योगेश गोसावी, संदीप बेंद्रे, गौरव शिंदे, श्री. पोवार आदींनी तपास केला.
डी मार्टच्या मागील बाजूस ‘मीरा भक्तीनगर’ या अपार्टमेंटच्या पिछाडीला असलेल्या शेतातील आरसीसी खोलीतील पाण्याच्या टाकीत कार्तिकीला बुडवून मारल्याची कबुली संशयिताने दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २३ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.