King Cobra Snake in Chandgad
King Cobra Snake in Chandgadesakal

King Cobra Snake : चंदगड तालुक्यात आढळला तब्बल बारा फूट लांबीचा 'किंग कोब्रा'

King Cobra Snake in Chandgad : या सापाला सुरक्षितरीत्या पकडून अधिवासात सोडण्याची सूचना त्यांनी रेस्क्यू टीमला दिली.
Published on
Summary

कोल्हापूर येथील आरआरटी टीम व व पार्ले (ता. चंदगड) येथील हत्ती बेस कॅम्प रेस्क्यू टीमने सापाला कोणतीही इजा न करता पकडले.

चंदगड : कळसगादे (ता. चंदगड) येथे किंग कोब्रा (King Cobra) जातीचा साप आढळला. ग्रामस्थांनी पाटणे (ता. चंदगड) वन विभागाला (Forest Department) यासंदर्भात माहिती दिली. याचवेळी मुख्य वनसंरक्षक रामानुजन व उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद कार्यालयीन कामकाजासाठी पाटणे येथे आले होते.

या सापाला सुरक्षितरीत्या पकडून अधिवासात सोडण्याची सूचना त्यांनी रेस्क्यू टीमला दिली. कोल्हापूर येथील आरआरटी टीम व व पार्ले (ता. चंदगड) येथील हत्ती बेस कॅम्प रेस्क्यू टीमने सापाला कोणतीही इजा न करता पकडले.

King Cobra Snake in Chandgad
Kaas Pathar : सुट्यांमुळे कास पठारावर पर्यटकांचा लोंढा; फुलोत्सव पाहण्यासाठी कसं करता येईल ऑनलाइन बुकिंग?

बारा फूट लांबीच्या किंग कोब्रा जातीच्या या सापाला सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले. वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांच्या मार्गदर्शनाने रेस्क्यू टीमचे प्रमुख प्रदीप सुतार, वनपाल जी. आर. डिसूजा, बी. आर. भांडकोळी, एस. जे. नागवेकर, वनरक्षक पी. एम. शिंदे, के. जी. कातखडे, विश्‍वनाथ नार्वेकर यांनी सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.