Kini Toll Naka : टोल 'फ्री' मिळेना! आता वाहनधारकांना प्रत्येक महिन्याला द्यावे लागणार 315 रुपये, काय आहे कारण?

Kini Toll Naka Kolhapur : वसुलीची मुदत २०२२ मध्ये संपल्यानंतर वसुलीला मुदतवाढ मिळाली.
Kini Toll Naka Kolhapur
Kini Toll Naka Kolhapuresakal
Updated on
Summary

कोल्हापूर-पुणे महामार्गावरील खड्डे बुजवले जात नाहीत, तोपर्यंत कोल्हापूर ते पुणे महामार्गावरील वाहतूक टोलमुक्त करावी, या मागणीसाठी काँग्रेसने किणी, कऱ्हाड, सातारा, पुणे येथील टोलनाक्यांवर आंदोलन केले.

घुणकी : आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसने (Congress) केलेले आंदोलन मागे घेतेवेळी २० किलोमीटरच्या परिघातील खासगी वाहनांना शंभर टक्के टोल (Kini Toll Naka Kolhapur) माफी करण्यात येईल, अशी केलेली घोषणा फोल ठरली असून, वाहनधारकांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस म्हणून प्रत्येक महिन्याला ३१५ रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे खासगी वाहनधारकांच्या पदरी घोर निराशा पडली आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावरील (Pune-Bangalore Highway) सातारा-कागल दरम्यानचे २००५ ला चौपदरीकरणाचे काम झाल्यानंतर तासवडे (जि. सातारा) व किणी (ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर) येथे पथकर वसुलीसाठी टोल नाके उभारले. वसुलीची मुदत २०२२ मध्ये संपल्यानंतर वसुलीला मुदतवाढ मिळाली.

Kini Toll Naka Kolhapur
Satej Patil : 'शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्ग म्हणजे सरकारची लाडका कंत्राटदार योजना'

सातारा-कागल दरम्यानचे सहापदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर पथकर वसुलीत २५ टक्के सुट देऊन वसुली कायम सुरू ठेवली आहे. दरम्यान, शनिवारी (ता. ३) कोल्हापूर-पुणे महामार्गावर खड्डेच खड्डे आहेत. महामार्गावरील खड्डे बुजवले जात नाहीत, तोपर्यंत कोल्हापूर ते पुणे महामार्गावरील वाहतूक टोलमुक्त करावी, या मागणीसाठी काँग्रेसने किणी, कऱ्हाड, सातारा, पुणे येथील टोलनाक्यांवर आंदोलन केले.

यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी किणी येथे पंधरा दिवसांत रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येतील, सद्यस्थितीत टोल दरामध्ये २५ टक्के सूट असून, उर्वरित टोल दरामध्ये २५ टक्के सुट देण्यासंदर्भात आम्ही वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. किणी टोल नाक्याच्या २० किमी परीघ क्षेत्रामध्ये जी गावे समाविष्ट आहेत, त्या गावांतील खासगी वाहनांना १०० टक्के टोल माफीची सवलत आहे. त्यासाठी मासिक पास घेणे आवश्यक आहे, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर २० किलोमीटर परिसरातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील खासगी वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आता टोल फ्री प्रवास झाला म्हणून खासगी वाहनधारकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले, मात्र मासिक पास घेतल्यानंतर फ्री टोल, असे सांगण्यात येऊन टोल आकारणी करण्यात येत आहे. शेवटी प्रत्येक महिन्याला ३१५ रुपये भरावेच लागणार असल्याने वाहनधारकांच्या पदरी निराशा पडली.

Kini Toll Naka Kolhapur
Sangli Politics : चंद्रहार पाटलांचा पराभव करणाऱ्या खासदार विशाल पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण

फास्टॅग नसेल तर दुप्पट...

राष्ट्रीय महामार्गावरील पथकर नाक्यावरून जाणाऱ्या वाहनांकडून रोख रक्कम घेतली जात होती. कॅशलेस व्यवहार आणि वेळेची पर्यायाने इंधनाची बचत होण्यासाठी शासनाने सर्व वाहनांसाठी १ जानेवारी २०२३ पासून फास्टॅग (fastag) अनिवार्य केले. ज्या वाहनचालकांकडे फास्टॅग सुविधा नाही, त्या वाहनधारकांकडून दुप्पट टोल आकारला जात आहे.

२० किलोमीटर परीघ क्षेत्रातील गावे

कोल्हापूर जिल्हा

तळसंदे, पारगाव, चावरे, निलेवाडी, वठार तर्फ वडगाव, पेठ वडगाव, भादोले, अंबप, अंबपवाडी, पाडळी, मनपाडळे, लाटवडे, भेंडवडे, खोची, मिणचे, सावर्डे, नरंदे, बुवाचे वाठार, आळते, वारणानगर, कोडोली, मोहरे, काखे, शहापूर, केखले, जाखले, पोखले, माले, संभापूर, टोप, नागाव, शिरोली, कासारवाडी, हालोंडी, शिये, भुये, मौजे वडगाव

सांगली जिल्हा

कणेगाव, तांदूळवाडी, येलूर, वशी, ऐतवडे खुर्द, येडेनिपाणी, इटकरे, कामेरी, बहादूरवाडी, कोरेगाव, भडकंबे, शिगाव, नागाव बागणी या गावांचा समावेश होऊ शकतो.

Kini Toll Naka Kolhapur
'किणी टोल नाका चालवण्याची थर्ड पार्टी कोणाकडं आहे, हे लवकरच सिद्ध होईल'; सतेज पाटलांचा रोख महाडिकांवर..

काय आहे मासिक पास योजना?

  • आधार कार्ड, आरसी बुक झेरॉक्स व ३१५ रुपये भरल्यास मासिक पास मिळणार

  • मुदत १ ते ३० किंवा ३१ तारीख आहे

  • वाहनधारकांनी प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीलाच पास घेणे आवश्यक आहे.

(उदा. २८ ऑगस्टला पास काढल्यास त्याची मुदत ३१ ऑगस्टला संपणार)

ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस म्हणून ३१५ रुपये भरून मासिक पास काढल्यानंतर टोल माफ मिळणार आहे.

-वसंत पंदरकर, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण

खासगी वाहनधारकांनी ३१५ रुपयांचा पास काढल्यानंतर टोल फ्री होणार असून, महिन्याचा कालावधी १ ते ३०/३१ तारीख आहे. प्रत्येक महिन्याला पास काढणे गरजेचे आहे.

-हर्षवर्धन शिंदे, व्यवस्थापक, किणी पथकर नाका

खासगी वाहनचालक कधीतरी पथकर नाक्यावरून जातात. ३१५ रुपयेही भुर्दंड आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ६० किलोमीटर अंतरावर एक टोल असेल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे कोणत्याही पाससाठी रक्कम घेऊ नये.

-प्रभाकर साळुंखे, नवे पारगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.