Kolhapur : घोटाळ्यांची चौकशी सुरूच राहणार; कोल्हापुरात येऊन सोमय्यांचं मुश्रीफांना ओपन चॅलेंज

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुश्रीफांनी घोटाळा केलाय.
Kirit Somaiya vs Hasan Mushrif
Kirit Somaiya vs Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

आमदार हसन मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे साखर कारखाना व गडहिंग्लज येथील अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना (ब्राक्स) इथं घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.

Kirit Somaiya Visit Kolhapur : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफांच्या (Hasan Mushrif) घोटाळा प्रकरणाची माहिती घेण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज (गुरुवार) कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान, त्यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेत जात बँकेचे सीईओ डाॅ. ए. बी. माने, व्यवस्थापक आर. जे. पाटील यांची भेट घेतली.

या भेटीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. भेटीनंतर सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफांवर हल्लाबोल केला. आमदार हसन मुश्रीफ परिवाराचा घोटाळा 500 कोटींहून अधिक आहे. शेतकऱ्यांना लुटण्यासाठी मुश्रीफांनी बँकेलाही सोडलं नाही. कोल्हापूर जिल्हा बँकेतून (Kolhapur District Bank) मुश्रीफांनी किती बोगस कर्ज घेतले, याची माहिती सात दिवसात द्यावी. आकडा जाहीर तुम्ही करा, अन्यथा आम्ही जाहीर करतो, असं आव्हान सोमय्यांनी मुश्रीफांना दिलंय.

Kirit Somaiya vs Hasan Mushrif
AIADMK : पलानीस्वामींनी जिंकली पक्षनेतृत्वाची लढाई; Supreme Court चा पन्नीरसेल्वम यांना मोठा दणका

सोमय्या म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुश्रीफांनी घोटाळा केलाय. त्यांनी संताजी घोरपडे साखर कारखान्याला (Santaji Ghorpade Sugar Factory) लुटलं. त्यांची सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे. त्यांच्या परिवाराचा 158 कोटींचा घोटाळा दिसत होता. पण, 500 कोटींचे आकडे बाहेर येत आहेत. शेतकऱ्यांना लुटण्यासाठी त्यांनी बँकेलाही सोडलं नाही, असा आरोप त्यांनी केला.

Kirit Somaiya vs Hasan Mushrif
Kolhapur Football : फुटबॉलच्या पंढरीत जोरदार राडा; मैदानातच खेळाडूंमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी

कोल्हापूर बँकेतून मुश्रीफांनी किती बोगस कर्ज घेतलं याची माहिती सात दिवसांत द्यावी. टॉप कर्जदारांची नावं जाहीर करावीत. मुश्रीफ, त्यांचा परिवार आणि त्यांच्या कंपन्या यासंदर्भात आयकर विभागानं धाडी घातल्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्याशी संबंधीत कोणीही काळजी करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना पुढं करून चौकशी थांबवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तरी अशा प्रकारची कारवाई थांबत नसते. मुश्रीफांनी केलेल्या घोटाळ्यांची चौकशी आणि कारवाई सुरू राहणार, असंही सोमय्यांनी म्हटलंय.

Kirit Somaiya vs Hasan Mushrif
Udayanraje Bhosale Birthday: माझं वय सांगायचा कुणी प्रयत्न केला तर कोणालाच सोडणार नाही; उदयनराजेंचा थेट इशारा

आमदार हसन मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे साखर कारखाना व गडहिंग्लज येथील अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना (ब्राक्स) इथं घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर ‘ईडी’नं छापे टाकले होते. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. एकूणच, ईडीनं केलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची चीड आहे. मात्र, मुश्रीफांनी केलेल्या आवाहनामुळं कार्यकर्त्यांमध्ये शांतता दिसून आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()