'गोडसाखर'वरील सोमय्यांचे आरोप पोरकट, बेताल'

'गोडसाखर'वरील सोमय्यांचे आरोप पोरकट, बेताल'
Updated on
Summary

कारखाना राज्य शासनाच्या परवानगीने ८ वर्षापूर्वी पुण्याच्या ब्रिस्क फॅसिलीटीज कंपनीला सहयोगी तत्त्वावर चालवण्यासाठी दिला आहे.

गडहिंग्लज : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्यावर (गोडसाखर) केलेले आरोप पोरकट, बेताल आणि निखालस खोटे आहेत, असे प्रत्युत्तर कारखान्याच्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या संचालकांनी दिले आहे. विभागाचे आमदार या नात्याने आठ वर्षांपूर्वी हा कारखाना पुण्याच्या ब्रिस्क कंपनीला सहयोगी तत्वावर चालवण्यास देण्यात मंत्री मुश्रीफ यांनी मध्यस्थी केली आहे. त्यांचा आर्थिक व्यवहाराशी कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरणही संचालकांनी दिले आहे.

कारखान्याचे संचालक व माजी जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील, अमर चव्हाण, विद्याधर गुरबे, दीपक जाधव, प्रकाश पताडे, जयश्री पाटील यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे, सोमय्या यांनी दोन वर्षांपूर्वी कारखाना मुश्रीफ यांनी केडीसीसी बँकेच्या माध्यमातून लिलावात घेतल्याचे सांगितले आहे. परंतु हा कारखाना राज्य शासनाच्या परवानगीने ८ वर्षापूर्वी पुण्याच्या ब्रिस्क फॅसिलीटीज कंपनीला सहयोगी तत्त्वावर चालवण्यासाठी दिला आहे. याचा करार पुण्याचे साखर आयुक्त यांच्यासमोर संचालक व ब्रिस्क कंपनी यांच्यादरम्यान रितसर झाला आहे. या प्रक्रियेशी केडीसीसी बँकेचा तर दुरान्वयेही संबंध नाही. हा कारखाना आर्थिक अडचणीत होता.

'गोडसाखर'वरील सोमय्यांचे आरोप पोरकट, बेताल'
राज्यात पुढच्या ४८ तासात मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

१८ महिने कामगारांचा पगार नव्हता. शेतकऱ्यांची उसाची व तोडणी- वाहतूकदारांची बिलेही द्यावयाची होती. अशा कठीण परिस्थितीत कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर होता. तो बंद पडू नये, हंगाम सुरळीत सुरू राहावा या भावनेतून तत्कालीन संचालक मंडळाने अनेक व्यक्ती व संस्थाना भेटून कारखाना चालवण्यासाठी देण्याचे प्रयत्न केले होते. त्यावेळच्या संचालक मंडळासह उसकरी शेतकरी, तोडणी -वाहतूकदार व असंख्य कार्यकर्त्यांनी या साखर कारखान्याची चाके फिरली पाहिजेत.

काहीही करा आणि कारखाना चालू करा, म्हणून या भागाचे आमदार या नात्याने मंत्री मुश्रीफ यांना साकडे घातले होते. त्यानंतर त्यांच्या पुढाकाराने पुण्यातील ब्रिस्क कंपनीला दहा वर्षासाठी कारखाना चालवण्यास दिला. आठ वर्ष्याच्या कारकिर्दीत कंपनीने शेतकऱ्यांची ऊसबिले व कामगारांचे पगार भागविले. तोडणी -वाहतूकदारांची बिले दिली. प्रसंगी तोट्यात जाऊन कंपनीने हा कारखाना समर्थपणे चालविला आहे.

'गोडसाखर'वरील सोमय्यांचे आरोप पोरकट, बेताल'
ऑस्ट्रेलियाला भूकंपाचा धक्का; मेलबर्न हादरले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.