ताजी फ्रेश भाजी आता डायरेक्ट तुमच्या किचनमध्ये

kitchen garden activity and fresh vegetables available in kitchen at home in kolhapur
kitchen garden activity and fresh vegetables available in kitchen at home in kolhapur
Updated on

कोल्हापूर : घरोघरी रोज शिजणारी भाजी त्यांनी त्यांच्या घरी पिकवली तर?  प्रत्येक कुटुंबाला किमान एक किलो भाजी मिळाली तर? नेमका हाच प्रयोग ‘किचन गार्डन‘ या नावाने सुरू झाला आहे. सिद्धगिरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामी यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ही संकल्पना पहिल्या १०० ग्राहकांपासून सुरवात केली जात आहे. ती देशभर पोचविण्याचा मानस आहे. 

कोरोनाच्या काळात अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्या. यात भाजी खरेदीसाठी होणारी धावपळ आणि खर्च  प्रत्येकाने अनुभवला आहे. हीच धावपळ आणि खर्च वाचविण्याचा प्रयत्न ‘वन रूम किचन‘ पासून सुरू होत आहे. मठातून १० जणांना या संकल्पनेचे प्रतिनिधीत्व देऊन त्या प्रत्येकाने १० व्यक्ती तयार करायचे आहेत. ज्यांच्या घरात दैनंदिनी भाजी पिकविली जाईल. यासाठी या शंभरजणांना आवश्‍यक सर्व साहित्य बी, रोपे, खत माती किंवा तत्सम साहित्य मठाकडून पुरवले जाईल. घरी केवळ कुंड्या आणि खराब डबे वापरायचे आहेत. दिवसाला एक किलो भाजी प्रत्येकाला मिळेल, असे नियोजन मठाच्या प्रतिनिधींकडून दिले जाईल. यासाठी टेरेसवर किंवा गॅलरीत ही भाजी पिकविता येईल.

शंभर जणांच्या उपक्रमाला सुरवात

दोन महिन्यानंतर तुमच्या घरी तुमच्या टेरेस किंवा गॅलरीवर तयार झालेली भाजी तुमच्या किचनमध्ये येईल, असे नियोजन मठाने केले आहे. आजपासून पहिल्या १०० जणांकडे हा उपक्रमाला सुरवात झाली.

प्रतिनिधी मार्गदर्शन करणार

भाजी पिकविण्यासाठी कोणतेही ज्ञान असण्याची गरज नाही. मठाकडून सर्व मार्गदर्शन केले जाईल. प्रत्येक १५ किंवा ३० दिवसांनी मठाचा एक प्रतिनिधी घरी येऊन मार्गदर्शन करेल. त्या प्रतिनिधीला दिवसाला केवळ २५ रुपये द्यावयाचे आहेत. यातून त्या तरुणालाही नोकरी मिळणार आहे. 

"घरी अपेक्षेपेक्षा अधिक भाजीचे उत्पादन झाल्यास ती मठाकडून खरेदी केली जाईल. यामुळे तुम्हाला सेंद्रिय भाजी मिळेलच, पण अधिकच्या भाजीतून आर्थिक उत्पन्नही मिळेल. केमिकल विरहित विषमुक्त भाजी देण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल."

- काडसिद्धेश्वर महाराज

"दहा जण मिळून ही संकल्पना शंभर घरांत राबवत आहे. भविष्यात ही संकल्पना देशभर व्हावी, आपल्याच दारातली भाजी आपल्याच किचनमध्ये शिजली पाहिजे, असा स्वामी काडसिद्धेश्‍वर महाराजांचा मानस आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्न सुरू केले आहेच. सहभागी होण्यासाठी मठात संपर्क साधावा."

– डॉ. संदीप पाटील

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.