कोल्हापुरात संततधार; 59 बंधारे पाण्याखाली

due to heavy rain panchganga river water level increased in kolhapur
due to heavy rain panchganga river water level increased in kolhapur
Updated on

कोल्हापूर: कोल्हापूर(kolhapur) जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. तर कसबा बावडा (kasaba bavda)येथील पंचगंगा नदीचे पाणी पातळी 33 फुटापर्यंत वाढली आहे. काल पंचगंगेची पाणी पातळी 32.1 फूट इतकी होती, तर विसर्ग 33 हजार 101 क्युसेक होता. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 58 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्रीदत्त मंदिरात चालू सालचा पहिला दक्षिणद्वार सोहळा शुक्रवार पहाटे 2 वा संपन्न झाला.kolhapur-59-dams-underwater-alert-to-riverside-village-rain-update

जिल्ह्यात काल सकाळी आठपर्यंत सरासरी १०४.३ मिलीमीटर पाऊस झाला असून, सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे पाच जिल्हा मार्गांसह एक राज्यमार्ग वाहतुकीस बंद झाला. तेथे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. आजरा वगळता इतर कोठेही पावसामुळे हानी झालेली नाही. पंचगंगेची पातळी बुधवारी दुपारी चारपर्यंत १३ फुटांवर होती. गुरुवारी पहाटे चार वाजता ती २१, तर दुपारी चार वाजता हीच पातळी तब्बल ३०.३ फुटांपर्यंत गेली. साधारण २४ तासांत पाणीपातळी १७ फुटांनी वाढली आहे. पात्राबाहेर पडलेले पंचगंगेचे पाणी पाहण्यास गर्दी झाली होती. तेथे पोलिसांनी कारवाई करून अनेकांना दंड सुनावला. अनेकांनी सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकले. शहरातील सखल भागात तर परीख पुलाखाली पाणी साचल्यामुळे वाहनधारकांची कसरत झाली.

दरम्यान, काल रात्रीच राजाराम बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे तो मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला. जिल्ह्यात ऑरेज अलर्ट असून यापूर्वीच हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. दरम्यान, राधानगरी धरणात २७ टक्के, तुळशी धरणात ५०, तर उर्वरित धरणांत ३०-३५ टक्के पाणी साठा आहे.

प्रकल्पातील विसर्ग (क्युसेकमध्ये)

गुरुवारी दुपारी चारची स्थिती

प्रकल्प - एकूण विसर्ग

राधानगरी - ११००

तुळशी - ५००

वारणा - ५५०

दूधगंगा - ११००

कासारी -२५०

कडवी -१८०

कुंभी -३००

पाटगाव -२२५

पाण्याखाली गेलेले बंधारे असे

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, शिरोळ व तेरवाड.

भोगावती नदी - राशिवडे व हळदी

तुळशी नदी - घुंगूरवाडी, बाचणी, आरे व बीड

दूधगंगा नदी - सुळकूड व बाचणी

कासारी नदी - यवलूज

कुंभी नदी - सांगशी, मांडूकली, शेणवडे व कळे

वारणा नदी - चिंचोली व माणगाव

घटप्रभा नदी - कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी

हिरण्यकेशी नदी - साळगाव, ऐनापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, जरळी व दाबीळ

वेदगंगा नदी - निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरूपली व चिखली

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (दलघमीमध्ये) - तुळशी ४८.८४, वारणा ४२८.२, दूधगंगा २३२.४५, कासारी २५.७४ , कडवी २७.३९, कुंभी ३३.०६, पाटगाव ४७.३४, चिकोत्रा १९.२७, चित्री २३.९९, जंगमहट्टी ९.९५, घटप्रभा ४४.१७, जांबरे १९.०८, आंबेआहोळ २.६१, कोदे (ल.पा) २.५०

पाऊस असा...

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा :

हातकणंगले- ८९.५, शिरोळ- ७३.२, पन्हाळा- ११५.१ , शाहूवाडी- १२७.३, राधानगरी- ११९.२, गगनबावडा-१८२.७, करवीर- ९७, कागल- ११०.१, गडहिंग्लज- १००.७, भुदरगड- ९७, आजरा- ८५.७ , चंदगड- ११३.१.

धरणातील पाणीसाठा

(टीएमसीमध्ये)

राधानगरी

२.४२

कोयना

३१.६७

अलमट्टी

२५.०७

विसर्ग असूनही पाच फुटांनी वाढ

पहिल्याच पावसात गडहिंग्लजला पूरस्थिती!

नृसिंहवाडीत दत्त मंदिरात पाणी

आंबेओहळ प्रकल्पात पाणी साठविण्यास प्रारंभ

चंद्रेनजीक पर्यायी रस्ता वाहून गेला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.