क्षणात स्वप्न उद्ध्वस्त; उमद्या तरुणांचा जीवनप्रवास अर्ध्यावरच संपला

मंगळवार पेठ, कसबा बावडा परिसरात हळहळ; अपघाताने स्वप्नांचा चुराडा
क्षणात स्वप्न उद्ध्वस्त; उमद्या तरुणांचा जीवनप्रवास अर्ध्यावरच संपला
Updated on

कोल्हापूर : अनेगा वडा सेंटरचा चालक अनिकेत ऊर्फ बबलू कुलकर्णी याचा मृत्यू त्याच्या कुटुंबासह त्याच्या मित्रपरिवाराला चटका लावणारा ठरला. (kolhapur accident) वडे विक्रीच्या माध्यातून व्यवसायाचे मोठे स्वप्न पाहात यशस्वी वाटचाल करणाऱ्या अनिकेतच्या जीवनाचा प्रवास मात्र अर्ध्यावाटेवरच संपला. तर कसबा बावडा येथील शेतकरी प्रताप घाटगे-इनामदार यांचा आदित्य एकुलता मुलगा. (kolhapur News) बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तो शेवटच्या वर्गात शिकत होता. दोन दिवसांपूर्वीच त्याची परीक्षा झाली. तत्पूर्वी झालेल्या कॅम्पस इंटरव्‍ह्यूमधून त्याची नोकरीसाठीही निवड झाली होती. नोकरीवर हजर होण्यापूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातला. (accident News)

शिंगोशी मार्केटहून अनिकेतच्या आई-वडिलांनी कष्टातून या व्यवसायास सुरवात केली. अनिकेतने या व्यवसायाच्या शाखा उघडत व्यवसाय तो वाढविण्याचा प्रयत्न केला. निम्म्या महाराष्ट्रात त्याचा विस्तार करण्याचा संकल्प त्याने केला होता. सकाळी त्याचा मृतदेह पाहून आई-वडिलांसह इतरांनी एकच टाहो फोडला. पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंकारासाठी गर्दी झाली होती.

क्षणात स्वप्न उद्ध्वस्त; उमद्या तरुणांचा जीवनप्रवास अर्ध्यावरच संपला
महिलांना समोर उभे करता, ही कसली मर्दुमकी; संजय राऊत भडकले

पाटाकडील तालीमजवळ अनिकेत ऊर्फ बबलू राजेंद्र कुलकर्णी राहत होता. तो एकुलता एक मुलगा होता. त्यांचा शिंगोशी मार्केट येथे अनेगा वडा सेंटर आहे. त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण पन्हाळा येथील संजीवनी स्कूल येथे झाले. त्यानंतर त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला.
त्याने वडिलांच्या व्यवसायात लक्ष घातले. न्यू महाद्वा रोड, मुक्त सैनिक वसाहत या ठिकाणी शाखाही काढल्या.

शालेय मित्राच्या भावाच्या लग्नासाठी तो चार मित्रांसोबत सातारा येथे मोटारीतून मंगळवारी गेला होता. त्यादिवशी हळदीचा कार्यक्रम होता तर आज लग्न होते. हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर तो त्याचे मित्र आदित्य घाटगे, देवराज माळी असे तिघेजण मोटारीतून रात्री उशिरा निवासाची सोय जेथे केली होती, तेथे जात होते. अन्य दोघे मित्र मात्र मोटारसायकलवरून पाठीमागून येत होते. त्याचवेळी हा अपघात झाला. सकाळी अनिकेतचा मृतदेह घरी आणला. त्यानंतर मृतदेह शिंगोशी मार्केट येथे नेला. सकाळी येथील भाजी मार्केट आणि परिसरातील दुकानेही काहीकाळ बंद ठेवली. गुरुवारी (ता.१२) रक्षाविसर्जन आहे.

क्षणात स्वप्न उद्ध्वस्त; उमद्या तरुणांचा जीवनप्रवास अर्ध्यावरच संपला
भारीच! कोकणवासियांना चाखता येणार आता 'काळ्या तांदळा'ची चव

बाबांच ऐकलं असतं तर...

कुलकर्णी कुटुंबाने महालक्ष्मीनगरात नुकतेच घर घेतले आहे. त्याचे रिन्यूव्हेशनचे काम सुरू आहे. अनिकेत व्यवसाय सांभाळत घराच्या कामाकडे लक्ष ठेवत होता. कधी नव्हे ते अनिकेतला वडिलांनी हळदीच्या कार्यक्रमाला आदल्यादिवशी जाण्यापेक्षा आज थेट लग्नालाच जा, असे सांगितले होते. ते बबलूने ऐकले असते तर हा अनर्थ घडला नसता अशी मित्रपरिवारांच्यात चर्चा सुरू होती.

नोकरीवर हजर होण्यापूर्वीच आदित्यवर काळाचा घाला

कसबा बावडा येथील प्रगतशील शेतकरी प्रताप घाटगे-इनामदार यांचा आदित्य एकुलता मुलगा. बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तो शेवटच्या वर्गात शिकत होता. दोन दिवसांपूर्वीच त्याची परीक्षा झाली. तत्पूर्वी झालेल्या कॅम्पस इंटरव्‍ह्यूमधून त्याची नोकरीसाठीही निवड झाली होती, पण नोकरीवर हजर होण्यापूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातला. आदित्यचा या परिसरात मित्र परिवारही मोठा होता. त्याच्या निधनाचे वृत्त मिळताच परिसर हळहळला. त्याच्या पश्‍चात एक विवाहित बहीण असून आई-वडील, चुलते, चुलती असा मोठा परिवार आहे. त्याच्याही अंत्यसंकारासाठी गर्दी झाली होती.

क्षणात स्वप्न उद्ध्वस्त; उमद्या तरुणांचा जीवनप्रवास अर्ध्यावरच संपला
पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात कोल्हापूरचे दोघे ठार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()