अखेर तीन महिन्यांनी शटर उघडले; ग्राहकांची सहकुटुंब गर्दी

अखेर तीन महिन्यांनी शटर उघडले;  ग्राहकांची सहकुटुंब गर्दी
Updated on

कोल्हापूर : एकमेकांना शुभेच्छा देत आज तब्बल तीन महिन्यांनी शहरातील दुकानादारांनी भयमुक्त व्यवसाय सुरू केला. आज, उद्या दुकाने उघडण्यास परवानगी मिळेल, या आशेवर असलेल्या दुकानदारांच्या सहनशिलतेचा अंत झाला होता. त्यामुळे शासनाच्या आदेशाला धाब्यावर बसवून शटर उघडण्याचा पवित्रा घेतल्यानंतर काल रात्री उशिरा पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) यांनी पाच दिवसांसाठी शहरातील दुकाने उघडण्यासाठी शासनस्तरावरून निर्णय आणला. त्यामुळे आज सकाळपासूनच शहरातील महाद्वार रोड, ताराबाई रोड, लक्ष्मी आणि शिवाजी रोड, राजारामपुरीतील (Mahadwar Road, Tarabai Road, Lakshmi Road, Shivaji Road, Rajarampuri)दुकाने, शोरुम आज अधिकृत उघडण्यात आली. सकाळी सात ते दुपारी चार दरम्यान ही दुकाने खुली राहिली. kolhapur-all-shop-open-in-today-lockdown-update-marathi-news

साड्यांची रेंज काय आहे, दहा रुपये तरी कमी करा की, कित्ती दिवसांनी आज दुकानात आलो अशा वेगवेगळ्या शब्दांत ग्राहक, विक्रेत्यांचा संवाद शहरातील ठिकाठिकाणी दिसून आला. नेहमी गजबजलेला महाद्वार रोड गेली तीन महिने सुनासुना होता. आठवड्यापूर्वी आक्रमक पवित्रा घेवून व्यापारी रस्त्यावर आले त्यावेळी काहींनी दुकानातील धुळ झाडली होती आणि तासाभरात दुकाने बंद करावी लागली होती. आज पुन्हा एकदा दुकानदार, कामगारांनी आनंद व्यक्त करीत, एकमेकानां शुभेच्छा देत दुकानाचे शटर उघडून भयमुक्त व्यवसाय सुरू केला. गेली काही दिवस शटर अर्धे ठेवून, आडमार्गाने ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा करताना दुकानदारांची दमछाक होत होती. महापालिका आणि पोलिसांच्या दंडासह गुन्हे दाखल करण्याच्या इशाऱ्यामुळे व्यापारी दबावाखाली आणि भितीने दुकानासोमर थांबून असायचे आता शासनाचाच निर्णय झाल्यामुळे भयमुक्त व्यापार आजपासून सुरू केला.

शहरातील सर्व निर्बंध पाच दिवसांसाठी शिथील केल्यामुळे महाद्वार रोडवर सहकुटुंब खरेदासाठी ग्राहक आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे टॉवेलसह इतर वस्त्र खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. बहुतांशी दुकानांत सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था होती. शक्यतो मोजकेच ग्राहक दुकानात घेवून पुन्हा पुढील ग्राहकांना दुकानात सोडले जाणे अपेक्षीत होत, मात्र तसे दिसत नव्हते. तसेच काही ठिकाणी गर्दी मध्ये कोरोनाचे कोणतेच नियम पाळले जात नव्हते. सरसकट दुकाने उघडल्यामुळे आज शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. हत्तीमहाल रोड, पान लाईन, महाद्वार रोड, लक्ष्मीरोड, राजारामपुरी मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. विशेषतः महिला वर्गांने साड्यांसह इतर दुकानांत गर्दी केली होती. काही मोठ्या शोरुम मध्ये मात्र ग्राहक दिसत नव्हता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()