कोल्हापूर : पेट्रोल-डिझेल दराचा भडका दिवसेंदिवस वाढत असतानाच सीएनजी गॅसचा पर्याय पुढे आला. मात्र तोही पुरेसा मिळत नसल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप होत आहे. शहरात दोन नवे पंप तयार असून ते सुरू न झाल्यामुळेही ग्राहकांची निराशा झाली आहे. दरम्यान सध्या आंबा घाटातून सीएनजी गॅसची वाहतूक होऊ शकत नसल्यामुळे हा तुटवडा आहे. याबाबत पत्रव्यवहार सुरू असून १५ दिवसांत तो सुरळीत होईल, असा विश्वास हिंदूस्थान पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पेट्रोल दर वाढल्यामुळे अधिकृत किटची मागणी वाढली. ३० हजारांत मिळणारे कीट ६५ हजारांपर्यंत पोहचले आहे, तरीही तेथे ग्राहकांची रांग लागली आहे. पेट्रोलचे दर कमी होणार नसल्याचा अंदाज ग्राहकांना आला आहे.
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येणार नसल्याचे केंद्र शासनाने जाहीर केले आहे. याला पर्याय म्हणून जिल्ह्यात सीएनजी पंप वाढले. अधिकृत किट बसविणाऱ्यांना तर उसंत नाही, इतके ग्राहक त्यांच्यासमोर उभे आहेत. तरीही सध्या गॅस भरण्यासाठी शहराबाहेर ५ ते ७ किलोमीटर जाऊन रांगेत उभे राहावे लागते. ५ ते १० किलो गॅस भरण्यासाठी दीड-दोन तास खर्ची घालावे लागतात.
निम्माच पुरवठा
रत्नागिरीतून आंबा घाटातून होणारी वाहतूक सुरू झाली असली तरीही बॅरिकेडस काढलेले नाहीत. सध्या चिपळूणमार्गे वाहतूक सुरू आहे. पूर्वी आंबा घाटातून दिवसांत दोन फेऱ्या होत होत्या. मात्र आता एकच फेरी होत असल्यामुळे सीएनजी १२ हजार किलो अपेक्षीत असताना रोज ६ हजार किलोच पुरवठा होत आहे. परिणामी तुटवडा जाणवत आहे. पंधरा दिवसात तो सुरळीत होईल, हिंदूस्थान पेट्रोलीयम कंपनीच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.
'पेट्रोल महागले, परवडत नाही म्हणून मोटारींना सीएनजी किट बसविले. मात्र पुरवठा होत नसल्यामुळे मनस्ताप होत आहे. सिंधुदूर्गमधून कर्नाटकात सुरळीत पुरवठा होतो. तेथे दरही कमी आहेत. तर रत्नागिरी, सिंधुदूर्गमधून कोल्हापुरात का होत नाही. याचा पाठपुरावा होणे अपेक्षीत आहे.'
- सुधीर पाटील,ग्राहक, फुलेवाडी रिंगरोड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.