Kolhapur : इथं विषयच हार्ड असतो! कोल्हापुरात 'फुटबॉल' ठरतोय राजकारणाचा केंद्रबिंदू; जाणून घ्या कारण

मोठ्या रकमांचे बक्षीस जाहीर करून मतांच्या राजकारणाचे बांधलेले सूत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
Kolhapur Football
Kolhapur Footballesakal
Updated on
Summary

फुटबॉलचे लोण ग्रामीण भागात पोचल्याने तिथल्या नेत्यांचे संघांना आर्थिक पाठबळ मिळत आहे. कुस्ती, कबड्डी, क्रिकेट पाठोपाठ फुटबॉलवेड्यांचा आलेख गतीने उंचावत आहे.

कोल्हापूर : खेळात राजकारण असू नये, असे बोलले जात असले, तरी कोल्हापूरच्या विश्‍वात ‘फुटबॉल’ (Kolhapur Football) राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्यातील खेळाडूंच्या संख्येचा आकडा लक्षात घेता राजकीय पेरणीसाठी फुटबॉलचा आधार घेतला जात आहे.

मोठ्या रकमांचे बक्षीस जाहीर करून मतांच्या राजकारणाचे बांधलेले सूत्र चर्चेचा विषय ठरत आहे. येत्या महापालिका, जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकांची (Kolhapur Assembly Election) त्याला किनार आहे. कोल्हापूर संस्थान काळात शहरातल्या पेठापेठांत फुटबॉलचे बीज रुजले गेले. फुटबॉल तालीम संस्थांच्या अस्मितेचा विषय बनला आहे.

राजकीय नेत्यांना फुटबॉलमागच्या मतांचे गणित माहीत असल्याने, फुटबॉलला ‘ग्लॅमर’ प्राप्त झाले आहे. खेळाडूंना वैयक्तिक बक्षिसांची खैरात करून खूश करण्याचा प्रयत्न करणे, त्याचाच एक भाग आहे. खेळाला प्रोत्साहन देण्याचा नेत्यांचा हेतू ‘शुद्ध’च नाही, असे म्हणता येणार नाही. फुटबॉलमध्ये पेठापेठांत वाढणारी टोकाची ईर्षा संपवायला मात्र कोणी पुढे येत नाही. त्यातूनच संघासंघांत ईर्षेची धग तयार होऊन गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत त्यांच्यातील वादाचा ट्रेलर दरवर्षी अनुभवायला मिळतो. त्याचा नाहक त्रास पोलिस यंत्रणेला सहन करावा लागतो.

फुटबॉलचे लोण ग्रामीण भागात पोचल्याने तिथल्या नेत्यांचे संघांना आर्थिक पाठबळ मिळत आहे. कुस्ती, कबड्डी, क्रिकेट पाठोपाठ फुटबॉलवेड्यांचा आलेख गतीने उंचावत आहे. जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांना मतांच्या बेजमीसाठी फुटबॉलचे महत्त्व पटले आहे. शहर परिसरात ही स्थिती निराळी नाही.

Kolhapur Football
Karnataka : काँग्रेस सरकार कोसळणार? सिद्धरामय्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

अगदी महापालिकेच्या निवडणुकीसाठी गठ्ठा मतदानाकरिता फुटबॉलसाठी लौकिक असलेल्या तालमीचे पाठबळ असेल, तर निवडणुकीतील विजयाचा मार्ग सुकर होतो, हा नेत्यांचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळेच ते संघांच्या मदतीसाठी तत्पर राहत आहेत. फुटबॉलच्या माध्यमातून खेळाडू अर्थात मतदारांपर्यंत पोचणे शक्य होत असल्याने स्पर्धा आयोजनाचा फंडा प्रभावी ठरतो. दरवर्षी त्या अनुषंगाने आडाखे बांधून संयोजक स्पर्धेसाठी केएसएकडे धाव घेतात.

Kolhapur Football
UPSC Result : शेतकरी बापानं काबाडकष्ट करुन पोराला शिकवलं, पोरानंही पांग फेडलं; 'यूपीएससी'त अक्षयची यशाला गवसणी
Kolhapur Football
Kolhapur Football

यंदा छत्रपती शाहू स्टेडियमवर राजर्षी छत्रपती शाहू केएसए लीग, सतेज, महापालिका, राजेश, चंद्रकांत, विष्णुपंत इंगवले सर, शाहू छत्रपती गोल्ड कप फुटबॉल स्पर्धा झाली असून, अटल चषक स्पर्धा सुरू आहे. त्यातून खेळाला प्रोत्साहन देण्याचा हेतू निश्‍चित स्वागतार्ह आहे. प्रेक्षकांना आवश्‍यक सुविधांकडे कोण लक्ष देणार, हा प्रश्‍न तितकाच महत्त्वाचा आहे. केवळ मतांवर डोळा ठेवून, फुटबॉलचा गाजावाजा करताना खेळाडूंच्या विकासासाठी ठोस पावले उचलावीत, ही फुटबॉलप्रेमींची अपेक्षा आहे.

Kolhapur Football
Kolhapur Crime : विजेचा शाॅक लागून 14 शेतकऱ्यांचा हकनाक बळी; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

दर्जेदार संघांना स्थानिक संघांविरुद्ध खेळवा

शाहू छत्रपती गोल्ड कपच्या निमित्ताने यंदा परराज्यातील संघांना आमंत्रित करण्यात आले. स्थानिक विरुद्ध परराज्यातील संघांतील खेळाडूंच्या कौशल्याची झलक अनुभवता आली. यापुढे स्पर्धा संयोजकाने तोच पॅटर्न राबवावा, अशी फुटबॉलप्रेमींची मागणी आहे. राजकारणासाठी फुटबॉलचा वापर होत असेल, तर दर्जेदार संघांना स्थानिक संघांविरुद्ध खेळविण्याची मानसिकता ठेवा, असा सूर व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.