Kolhapur Band : कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता; बंदला हिंसक वळण, जमावाकडून गाड्यांची तोडफोड, पोलिसांचा लाठीहल्ला

काही हिंदुत्ववादी संघटनांनी (Hindu Association) पुकारलेल्या कोल्हापूर बंदला काल (बुधवार) हिंसक वळण लागले.
Kolhapur Band News Updates
Kolhapur Band News Updatesesakal
Updated on
Summary

पोलिसांनी आतापर्यंत १० कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Kolhapur Band News Updates : काही हिंदुत्ववादी संघटनांनी (Hindu Association) पुकारलेल्या कोल्हापूर बंदला काल (बुधवार) हिंसक वळण लागले. निदर्शने करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते तेथून विविध भागांमध्ये पांगले आणि शहरात १३ ठिकाणी दगडफेकीचे प्रकार झाले.

यामध्ये दुकाने, हातगाड्या, वाहने यांची मोडतोड करण्यात आली. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी (Kolhapur Police) लाठीमार केला. भाऊसिंगजी रोडवर अश्रुधुराचा वापर करून दगडफेक करणाऱ्या तरुणांना पांगविण्यात आले. आजच्या घटनेत दोन तरुण आणि पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. तूर्त शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

Kolhapur Band News Updates
Kolhapur : औरंगजेबच्या समर्थनार्थ पोस्ट; कोल्हापुरात तणाव, 'जय श्रीराम'चा नारा देत कडक कारवाईची मागणी

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १० कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान हिंसक वळण लागलेल्या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. कोल्हापुरात मंगळवारी (ता. ६) शिवराज्याभिषेक दिनी एका तरुणाने आक्षेपार्ह स्टेट्स ठेवल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी एकत्र येऊन संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी निदर्शने केली. त्यांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला तर काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर सायंकाळी कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन कोल्हापूर बंदचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे आज सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शेकडो कार्यकर्ते एकत्र आले. येथे त्यांनी निंदनीय घटनेबाबत निदर्शने केली. त्यानंतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे सुरू होती. त्याचवेळी त्यांच्यामधील कार्यकर्त्यांचा एक गट जवळच्याच गंजी गल्लीमध्ये घुसला आणि तेथील घरांवर आणि दुकानांवर दगडफेक सुरू केली.

Kolhapur Band News Updates
Kolhapur Bandh : कोल्हापुरात कडकडीत बंद; जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीमार, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

काही कार्यकर्ते लुगडी ओळ भागात गेले. येथेही त्यांनी घरे, दुकाने यांना लक्ष्य केले. या जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करून त्यांना माळकर तिकटीकडे हुसकावले. तोपर्यंत हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते गटागटाने शहरभर पसरले.

Kolhapur Band News Updates
Kolhapur Bandh : कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणाबाहेर; आक्रमक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

पापाची तिकटी, अकबर मोहल्ला, महाद्वार रोड, सरस्वती टॉकीज, उमा टॉकीज, राजाराम रोड, भाऊसिंगजी रोड येथेही जोरदार दगडफेक करण्यात आली. यामध्ये दुकानांच्या काचा, खिडक्यांच्या काचा, रिक्षा, हातगाड्या फोडण्यात आल्या. भाउसिंगजी रोडवर पोलिसांनी दोन्ही गटांना पांगविण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. दगडफेकीच्या घटनेमध्ये दोन तरुण आणि पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले.

इंटरनेट सेवा बंद

सोशल मिडियावरून आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्यात येऊ नयेत यासाठी प्रशासनाने बुधवारी (ता. ७) सायंकाळी ७ वाजल्यापासून गुरुवारी (ता. ८) मध्यरात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद केली आहे. तणावग्रस्त परिसरात ३१ तास इंटरनेट बंद राहणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

Kolhapur Band News Updates
Kolhapur Bandh : आक्रमक जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या कांड्या; दुकानांची, मालगाड्यांची तोडफोड

चप्पलांचे ढीग आणि पडलेल्या गाड्या

महापालिका चौक परिसरात पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर तरुणांनी चप्पल टाकून पळ काढला. पळताना रस्त्याकडेला असणाऱ्या दुचाकीही त्यांनी पाडल्या. त्यामुळे चौकात चपलांचे खच आणि पडलेल्या गाड्या असे चित्र दिसत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.