Kolhapur Bandh : कोल्हापुरात दोन गटांमध्ये हिंसक चकमक, जिल्हाधिकाऱ्यांनी उचलले मोठे पाऊल

Kolhapur Bandh : कोल्हापुरात दोन गटांमध्ये हिंसक चकमक, जिल्हाधिकाऱ्यांनी उचलले मोठे पाऊल
Updated on

Kolhapur Bandh : औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे कौतुक करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टवरून कोल्हापुरात दोन गटांमध्ये हिंसक चकमक उडाली आहे. यामध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

कोल्हापूरचे एसपी महेंद्र पंडित यांनी सांगितले की, मंगळवारी औरंगजेबची स्तुती करणारी एक पोस्ट व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाली होती. याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी बुधवारी कोल्हापूर बंदची घोषणा केली होती. या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

कोल्हापूर शहरात सध्या शांतता आहे. मात्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. शहरातील इंटरनेट बंद करण्यात आले आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावारु या दंगलीवर प्रतिक्रिया दिली आहे. काल घडलेल्या घटनेवर आज संध्याकाळी सर्व धर्माच्या नेत्यांना बैठकीसाठी बोलावण्यात येणार आहे. सर्वांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

Kolhapur Bandh : कोल्हापुरात दोन गटांमध्ये हिंसक चकमक, जिल्हाधिकाऱ्यांनी उचलले मोठे पाऊल
Union Cabinet: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ

राहुल रेखावार म्हणाले, सर्व लोकप्रतिनिधींशी देखील माझी चर्चा झाली आहे. त्यांनी प्रशासनाला मदत करण्याचे वचन दिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शांतता राहीले पाहिजे यामुळे जिल्ह्याची उन्नती होईल. आत जिल्ह्यात पूर्णपणे शांतता आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा जिल्ह्यात तैनात करण्यात आला.

सोशल मीडियावरवरील पोस्टवर दुर्लक्ष करा. परिस्थिती शांत राहण्यासाठी आम्ही वाटेल ते करु. कोल्हापूरचा इतिहास समतेचा आहे. सर्वधर्म समभावाचा आहे. याचे उदाहरण आपण सर्व जगाला दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहु महाराजांची ही धरती आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

Kolhapur Bandh : कोल्हापुरात दोन गटांमध्ये हिंसक चकमक, जिल्हाधिकाऱ्यांनी उचलले मोठे पाऊल
Kolhapur Bandh : सरकारने दोषींवर इतकी कठोर कारवाई करावी, की…; कोल्हापूर प्रकरणी संभाजीराजे कडाडले!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.