Kolhapur Bandh : 'ती' बातमी वाऱ्यासारखी आली आणि प्रचंड तणाव निर्माण झाला; रस्त्यावर सामसूम, दुकानं पटापट बंद

दुपारी दोनच्या सुमारास आक्षेपार्ह पोस्टचा विषय पुढे आला. त्यानंतर काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर धाव घेतली.
Kolhapur Bandh
Kolhapur Bandhesakal
Updated on
Summary

मोबाईलवरील आक्षेपार्ह पोस्टवरून दुपारी दोन वाजता निर्माण झालेल्या या वातारणामुळे शहराच्या मध्यवर्ती परिसरातील दुकानेही काही काळ बंद झाली.

कोल्हापूर : अचानक जमलेला जमाव, त्यांच्याकडून परिसरात सुरू असलेली शोधमोहीम, त्यांच्या मागे धावणारे पोलिस आणि हा सर्व प्रकार बघत घाबरून पळणारे नागरिक आणि त्यामुळे निर्माण झालेला तणाव, असे अभूतपूर्व वातावरण काल शहरातील लक्ष्मीपुरी, दसरा चौक आणि सीपीआर चौकासारख्या गर्दीने नेहमी गजबजलेल्या परिसराने अनुभवले.

मोबाईलवरील आक्षेपार्ह पोस्टवरून दुपारी दोन वाजता निर्माण झालेल्या या वातारणामुळे शहराच्या मध्यवर्ती परिसरातील दुकानेही काही काळ बंद झाली. तब्बल चार तासांनी तणाव कमी झाला. पण, त्याची धग कायम होती. परिणामी या परिसरातील दुकानांसह अपवाद वगळता इतर व्यवसाय बंदच राहिले.

दुपारी दोनच्या सुमारास आक्षेपार्ह पोस्टचा विषय पुढे आला. त्यानंतर काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर धाव घेतली. वाऱ्यासारखी ही बातमी कोल्हापुरात समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी या परिसरात गर्दी केली. व्हायरल स्टेटस भाऊसिंगजी रोडवरून आल्याचे समजताच या कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा त्या परिसराकडे वळवला.

Kolhapur Bandh
Kolhapur : छत्रपती शिवरायांवर आक्षेपार्ह पोस्ट; राजकीय नेत्यांनी कोल्हापुरातील जनतेला केलं 'हे' आवाहन

तेथून हे कार्यकर्ते सिध्दार्थनगर परिसरात आले आणि पुढे हा मोठा जमाव होऊन तो दसरा चौकात आला. पुढे जमाव आणि त्याच्या मागे लाठी घेऊन धावणारे हेल्मेटधारी पोलिस असे वातावरण पाहायला मिळाले. दसरा चौकात या जमावाने एका तरुणाला माराहाण केल्याने एकच धावपळ उडाली. या परिसरातील हातगाड्यासह व्यवहार बंद झाले. लोक सैरावैरा पळू लागले. त्यात अनेकजण खाली पडले, काहींची चप्पलेही त्याच परिसरात पडली.

Kolhapur Bandh
Kolhapur Bandh : शिवरायांवर आक्षेपार्ह पोस्ट; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात, आज कोल्हापूर बंदची हाक

पोलिसांना हा जमाव पांगवल्यानंतर हेच कार्यकर्ते पुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर एकत्र आले. या प्रकाराची माहिती मिळताच सीपीआर ते महापालिका, लक्ष्मीपुरी आणि दसरा चौकातील दुकाने पटापट बंद झाली. दुकानदार दारातच थांबून झालेला प्रकार बघत राहिले, तर अन्य कामासाठी आलेल्या नागरिकांनी रस्ता दिसेल त्यादिशेने धाव घेऊन या दंग्यापासून स्वत:चा बचाव केला. या प्रकाराने या चौकातील वाहतूकही काही काळ खोळंबली.

Kolhapur Bandh
Kolhapur Bandh : छ. शिवाजी महाराजांवर वादग्रस्त स्टेटस्; कोल्हापुरात शुकशुकाट, शहरात मोठा पोलिस बंदोबस्त

पर्यटकांचे हाल

उन्हाळी सुटीमुळे शहर आणि परिसरात अन्य जिल्ह्यांतील पर्यटकांची मोठी गर्दी आजही होती. घडलेल्या घटनेचे पडसादही लक्ष्मीपुरी, दसरा चौक, सीपीआर परिसरात उमटले. याच परिसरातून अंबाबाई मंदिर, जोतिबा व पन्हाळ्याकडे वाहनातून चाललेले पर्यंटक सैरभर झाले. रस्त्यावर गर्दी आणि त्यातून मार्ग काढताना त्यांना कसरत करावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.