BJP: आम्ही तुम्हाला आमच्या पक्षात घेतले आहे. पण पुढे आम्हाला तुम्ही पक्षातून काढू नका, असा चिमटा माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी काढल्यानंतर आक्रमक शैलीत आमदार प्रकाश आवाडे यांनी उत्तर दिले. मी भाजपला पाठिंबा देवून पाच वर्षे झाले, पण मी अद्याप तुमच्या कार्यालयात आलो नाही. आता तुम्ही सन्मानांने बोलविल्यावरच येणार आहे, असे सांगत त्यांनी एकप्रकारे हाळवणकर यांना आव्हानच दिले.
इचलकरंजीतील एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले आमदार आवाडे व माजी आमदार हाळवणकर आदा एकाच पक्षात म्हणजे भाजपमध्ये आहेत. आमदार आवाडे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पण अद्याप या आजी-माजी आमदारांध्ये फारसे सूर जुळले नसल्याचे चित्र आज पून्हा दिसले.