KDCC Election: ए. वाय. पाटलांना शह देण्यासाठी काँग्रेसचा पवित्रा

KDCC Election: ए. वाय. पाटलांना शह देण्यासाठी काँग्रेसचा पवित्रा
Updated on

राशिवडे बुद्रुक (कोल्हापूर) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीसाठी राधानगरी तालुक्यात काँग्रेस पक्षाने आज रणशिंग फुंकले. विद्यमान संचालक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना शह देण्याचा जणू विडाच उचलला असून आज पक्षाच्यावतीने भोगावती कारखान्याचे संचालक विश्वनाथ पाटील येळवडेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे सबंध जिल्ह्याचे याकडे लक्ष लागणार आहे.

साधारण पंचवीस वर्षापूर्वी काँग्रेसचे नेते बँकेचे तत्कालीन अध्यक्ष कृष्णराव किरूळकर यांच्या विरोधात येथील काँग्रेस पक्षानेच नवे नेतृत्व म्हणून ए. वाय. पाटील यांना पुढे आणले पाटील यांनी या संधीच्या जोरावर सलग पंचवीस वर्षे खुर्ची अबाधित ठेवून आपला वट्ट निर्माण केला. आता त्याच काँग्रेसने ए. वाय. पाटील यांना पायउतार करण्यासाठी चंग बांधला आहे. तालुक्यात पक्षाची वाताहत आणि राष्ट्रवादीच्या विरोधात असलेल्या पक्षांना विचारात घेतले जात नाही हे कारण या उद्रेकाचे ठरत आहे.

KDCC Election: ए. वाय. पाटलांना शह देण्यासाठी काँग्रेसचा पवित्रा
विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्या; नारायण राणेंचे आवाहन

आज तालुक्यातील काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले, ज्येष्ठ नेते पी. डी. धुंदरे, विजयसिंह मोरे या नेत्यांनी कोल्हापूर येथे आज बैठक घेऊन विश्वनाथ पाटील यांच्या नावावर एकमत केले. यानंतर तालुक्यातील सर्व नेत्यांची बैठक भोगावती येथे झाली व येथे झालेल्या पत्रकार बैठकीत पाटील यांच्या नावाची घोषणा केली. जिल्हा बँकेसाठी सेवा संस्था गटातून श्री. पाटील यांची उमेदवारी निश्चित असून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असा निर्धार एकमुखी करण्यात आला. जरी जिल्ह्यात महाअाघाडीची घोषणा झाली आणि बिनविरोध चे संकेत ठरले तरीसुद्धा राधानगरी तालुक्यातून श्री. पाटील यांची उमेदवारी कायम राहणार असेही स्पष्ट करण्यात आले.

गेल्या पंचवीस वर्षात जिल्हा बँकेसाठी असलेल्या संचालकांकडून अन्य पक्षांना पायदळी तुडविण्याचे काम झाले. काँग्रेससह मित्रपक्षांची वाताहत करण्याचे धोरण अवलंबल्याने हा पवित्रा घेत आहोत. असे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चौगले व धुंदरे यांनी स्पष्ट केले. तर गेल्या वेळी ए. वाय. यांच्यासाठी मी माघार घेतली होती आत्ता त्यांनी माघार घ्यावी अन्यथा आव्हान स्वीकारावे. असे विश्वनाथ पाटील यांनी सांगितले. काँग्रेसच्या या ठाम भूमिकेमुळे राधानगरीत कोणत्याही स्थितीत निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट झाले आहे. या बैठकीला राधानगरी तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगले, बिद्रीचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, गोकुळचे माजी संचालक पी.डी. धुंदरे, भोगवतीचे माजी माजी अध्यक्ष संजयसिंह पाटील विद्यमान संचालक चौगले धीरज डोंगळे, ए. डी. चौगले, बी. आर. पाटील, रवींद्र पाटील, जयवंतराव कांबळे, सिरसेचे सरपंच सुभाष पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.